व्हायरल न्यूज

Video Viral : डोळ्यात पेपर स्प्रे मारून महिलेचा दुकान लुटण्याचा प्रयत्न; प्लान फसताच दुकानदाराने दिला चापटांचा प्रसाद

Video Viral : एका महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला एका दुकानदाराच्या डोळ्यात स्प्रे टाकून चोरी करण्याचा प्रयत्न करत होती.

Bharat Jadhav

Woman Try To Theft In Shop:

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला चोरी करण्यासाठी दुकानात गेली. तिच्याकडे असलेल्या स्प्रे दुकानदाराच्या डोळ्यात टाकून तिने दुकानात चोरीचा प्लान केला होता. परंतु युक्ती फसली आणि ती पकडली गेली. त्यानंतर दुकानदाराने तिला चांगलाच चोप दिला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. नेटकरी दुकानदाराचे कौतुक करत आहेत. (Latest News)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुकानाच्या काउंटरवर एक पुरुष बसलेला आहे. एक महिला ग्राहक म्हणून दुकानात येते. दुकानदार सामान दाखवण्यात व्यस्त असताना महिलेने आपल्या पिशवीतून एक स्प्रे काढून दुकानदाराच्या डोळ्यावर मारला. परंतु दुकानदाराने लगेच मान फिरवल्यानं त्याला कोणतीच इजा झाली नाही. त्यानंतर दुकानातील एक वस्तू उचलून महिलेला मारून फेकली. त्या वस्तूच्या मारमधून ती महिला चोर सावरत नाही तोच दुकानदार तिच्यापर्यंत पोहोचतो आणि तिच्यावर हल्ला चढवतो. एकामागोमाग तीन-चार चपराक त्या महिलेला लगावतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुकानाच्या सीसीटीव्हीमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना दुकानदाराचे कौतक केलं आहे. तर काहींनी महिला चोराला शाब्दिक टोला मारत आहेत. यावर एक यूजर म्हणाला की, जेव्हा माणसाचं नशीब खराब असतं तेव्हा असेच होते. या महिलेला खरं पेपर स्प्रेच्या मदतीने दुकान लुटायची होती, किती मुर्ख आहे. एकाने लिहिले की, अशा महिलांनी मिरपूड स्प्रे कशासाठी वापरायचे ते शिकले पाहिजे. गरज पडली तरीही ते कधीही करू शकणार नाहीत.

एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, जेव्हा इतिहासात अयशस्वी चोरीच्या घटनांवर चर्चा होईल त्यावेळी हा व्हिडिओ दाखवता येईल. एकाने लिहिले की, महिलेला आणखी चांगली मारहाण व्हायला हवी होती. दरम्यान हा व्हिडिओ @cctvidiots नावाच्या X खात्यावर व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

परिणिती चोप्राचा नवरा राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Maharashtra Live News Update : जळगावात एटीएम मशीन चोरीला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Skin Care Summer: उन्हाच्या कडाक्यात चेहऱ्याला लावू नका या गोष्टी, डॉक्टरांनी दिल्या टिप्स

Kalyan : कल्याणमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, डॉक्टरचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics: राहुरीत राजकीय घडामोडींना वेग, भाजप उमेदवाराच्या विरोधात माजी मंत्री रिंगणात

SCROLL FOR NEXT