Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मर्दानी! पोटासाठी दुचाकीवर बाळाला घेऊन डिलिव्हरीचे काम, तिचा व्हिडीओ पाहून कौतुक करालच

Viral News: सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओचे व्हायरल होण्या मागचे कारण एकदा तुम्ही व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

सोशल मीडियावर आपल्याला अनेक गमतीदार व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात मात्र काही व्हिडिओ असे असतात ज्याने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जातो तर कधी नवीन गोष्ट शिकण्यास मिळते. अशा संदर्भात सोशल मीडियावर एका ताईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती लहानशा तिच्या मुलाला घेऊन खाद्यपदार्थ घरी पोहचवण्याचे काम करते. मात्र नेमके काय खास आहे या व्हिडिओत ते तुम्ही पाहा.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक महिला बाईक चालवताना दिसत आहे. तिच्या सोबत बाईकवर लहानसा तिचा मुलगा आहे. मात्र व्हिडिओत पाहिले तर ही महिला खाद्यपदार्थ घरी पोहचवण्याचे काम करत आहे. काही वेळात एक तरुण व्हिडिओत दिसतो आणि त्या महिलेला ती बाईक का चालवत आहे आणि तिच्या सोबत कोण आहे ते विचारतो, त्यानंतर ती महिला(Women) सर्व माहिती त्या तरुणाला सांगते. सध्या सोशल मीडियावर या महिलेची गोष्ट ऐकून तिचे कौतुक करत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''vishvid'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर व्हिडिओला हजारोंच्या संख्येने लाईक्स मिळाले असून लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. त्यातील अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.

व्हिडिओतील कमेट्स बॉक्समध्ये एका यूजरने लिहिले आहे की,''आपल्या मुलांसाठी केले'' तर अजून एका यजूरने लिहिले आहे की,'' खूपच छान'' अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया नेटकरी वर्गाने केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशावर येणार अस्मानी संकट; ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तीन महाभयानक वादळं धडकणार

Hartalika Vrat Niyam: हरतालिका व्रतात काय खावे आणि काय टाळावे? तुम्हाला माहितीये का?

Weight Gain Reasons: डाएट आणि एक्सरसाइज करूनही वजन वाढतंय? 'या' ७ चुका तुमचा प्रयत्न करू शकतात फेल

Central Railway News : दुष्काळात तेरावा महिना! मेगा ब्लॉक सुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा ४५ मिनिटे उशिराने

Maharashtra News Live Update: Mumbai: पुण्यात मराठा बिझनेस कम्युनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो

SCROLL FOR NEXT