shocking viral video: सोशल मीडियाच्या दुनियेत दररोज काही ना काही अजब-गजब घटना घडतात. कोण काय करेल याचा काही नेमच राहिलेला नाही. कुणी फेमस होण्यासाठी वेगळी स्टाईल अंगिकारतो, तर कुणी शॉकिंग गोष्टी करून चर्चेत येतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील महिलेनं एक असा दावा केला आहे की, ऐकून नेटकरी अक्षरशः थक्क झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर एका महिलेनं शेअर केलेला व्हिडिओ प्रचंड गाजतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये ती महिला तिच्या रोजच्या दिनचर्येतील एक सवय सांगते आणि ही सवय इतकी विचित्र आहे की लोकांना विश्वासच बसत नाही. ती महिला म्हणते, "मी दररोज सकाळी उठल्यानंतर माझ्या डोळ्यांना माझ्याच लघवीने धुते''.
या विधानानं इंटरनेटवर अक्षरशः खळबळ उडवून दिली आहे. अनेकांना वाटलं की ही एखादी विनोदी क्लिप असेल, पण नंतर लक्षात आलं की हे तिने गंभीरपणे सांगितलं आहे. तिने याला आरोग्यदायी सवय म्हणून संबोधलं आहे.
या महिलेचा असा विश्वास आहे की, स्वतःच्या युरीनमध्ये औषधी गुणधर्म असतात. तिच्या म्हणण्यानुसार, युरीनमध्ये प्राकृतिक औषधी तत्त्वं असून ती डोळ्यांमधील इन्फेक्शन, कोरडेपणा, अशक्तपणा दूर करतात. तिचं असंही म्हणणं आहे की, यामुळे तिच्या डोळ्यांवर चष्म्याची गरज भासत नाही आणि दृष्टी अधिक तेजस्वी राहते.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेचा भडिमार केला. अनेकांनी तिला ''अंधश्रद्धआ पसरवते'' असे म्हटलं आहे तर काहींनी म्हटलं की,''घाणेरडा सल्ला देणारी'' म्हटलं आहे'' असा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.