Badlapur News Saam Tv
व्हायरल न्यूज

Badlapur News: मुलाला बॉल लागला, आईचा राग अनावर, शेजारच्या पोराला अमानुष मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या बदलापूरमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.नक्की घटना काय आहे ते एकदा पहाच.

Tanvi Pol

Shocking Video: बदलापुरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.जिथे बदलापुरमधील सोसायटीत व्हॉलीबॉल खेळणाऱ्या मुलाकडून आपल्या मुलाला बॉल लागल्याच्या रागातून एका महिलेनं 14 वर्षीय मुलाला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केलीय. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बदलापूर(Badlapur) पूर्वेच्या कात्रप परिसरातील उच्चभ्रू सोसायटी आहे. या सोसायटीत राहणारा १४ वर्षीय मुलगा रविवार १९ जानेवारी रोजी सोसायटीत व्हॉलीबॉल खेळत होता. यावेळी तिथे खेळणाऱ्या एका ४ वर्षीय मुलाला त्यांचा बॉल लागला,

त्यामुळे त्याच्या भावाने आईला बोलावलं. यानंतर या मुलाच्या आईने तिथे येत काहीही न विचारता त्या चिमुकल्याला याला थेट मारहाण सुरू केली. तिने अनेकदा त्याच्या कानशिलात लगावल्या, पोटात लाथा घातल्या, तसंच त्याचा गळा पकडून तुला मारून टाकीन, कापून टाकीन अशा धमक्या दिल्या.

सर्व घटनेदरम्यान ज्या चिमुकल्याला मारहाण झाली त्याची आज्जी त्याला सोडवायला मध्ये पडली असता तिलाही या महिलेने धक्काबुक्की(Fighting) आणि शिवीगाळ केल्याची माहिती चिमुकल्याच्या आजीने दिली. मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. यानंतर चिमुक्याच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

टीप : सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT