Wife Beat Husband With Chappal
Wife Beat Husband With Chappal Saam TV
व्हायरल न्यूज

Wife Beat Husband With Chappal: पत्नीकडून पतीची भररसत्यात धुलाई; गाल लाल होईपर्यंत चपलेने दिला चोप, VIDEO VIRAL

Ruchika Jadhav

Himachal Pradesh:

पती पत्नीमधील नात्यात प्रेमाप्रमाणेच भयंकर वाद आणि हाणामाऱ्या होताना पाहायला मिळतात. भारतात अनेक ठिकाणी महिला हुंडा किंवा कौटुंबीक हिंसाचाराच्या बळी ठरल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता महिला आपली बाजू मांडून पतीला प्रत्युत्तर करतात. अशात सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झालाय. यात एका पत्नीने आपल्या पतीची चपलेने धुलाई केलीये. (Latest Viral Video)

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ १ मिनिटांचा आहे. या व्हिडीओत महिलेने ६ सेकंदात तिच्या पतीला ६ वेळा चपलेने मारलंय. सदर घटना हिमाचल प्रदेशातील हमीपुरमध्ये घडली आहे. महिलेने भररत्यात पतीला चपलेने प्रसाद दिलाय. महिला आपल्या पतीला मारत असताना रस्त्यावर बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे.

@MishraAnanya3 या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, गेल्या ५ वर्षांपासून या दोन्ही पतीपत्नीमध्ये वाद सुरू होते. कोतवाली क्षेत्र बस स्टँडवर हा सर्व प्रकार घडला आहे.

सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नागरिकांनी यावर विविध कमेंट्स केल्यात. या व्यक्तीने ५ वर्षांपासून त्याच्या पत्नीचा फार छळ केला असणार त्यामुळे आता ती त्याला अशी मारत आहे असं एकाने म्हटलं आहे. तर अशा व्यक्तींना पोलिसांत द्यायला हवं अशी कमेंट एकाने केलीये. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी देखील पाठवले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला अल्टिमेटम; आरक्षण दिलं नाही तर या तारखेला उग्र आंदोलनाचा इशारा

Pune Porsche Car Accident Case: आरोपीला वाचवण्यासाठी स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव; RTI अधिकाऱ्याचा आरोप

Maharashtra Lok Sabha Voting Live: निकालाआधीच सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामाच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये फोडले फटाके

Lok Sabha Election Voting | बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी बजावला मतादानाचा हक्क!

Shiv Sena UBT vs BJP: मतदान केंद्रावरच ठाकरे गट आणि भाजप एकमेकांना भिडले!

SCROLL FOR NEXT