Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रिल्सचा नाद बेक्कार... चिमुकली नदीत बुडतेय अन् ती व्हिडीओ काढण्यात मग्न, मन सुन्न करणारा व्हिडीओ

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Viral Video: गेल्या काही वर्षापासून प्रत्येकजण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. मग कुठे पोस्ट करणं असो वा रिल्स बनवणे. रिल्स बनवणे म्हणजे सध्याच्या काळात अॅक्टीव राहाणे असे अनेकांना वाटते. मग रिल्स बनवण्याच्या नादातून अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात रिल्स बनवताना कुटुंबिय व्यस्त होते आणि चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे. सध्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला नदी काठी काही महिला आणि एक पुरुष शिवाय काही लहान मुलं बसलेली आहे. मात्र सर्वजण पाण्यात खेळण्यात व्यस्त दिसत आहे. अशातच एक चिमुकली तुम्हाला पाण्यात बुडताना दिसत आहे, मात्र कोणाचेही त्या चिमुकलीकडे लक्ष नसल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. संपूर्ण व्हिडिओ नदी बाहेर असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे. मात्र घडत असलेली घटना कोणाच्याही बघण्यात आलेली नाही त्या वेळी.सध्या या घटनेचा व्हिडिओ(Video) सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

धक्कादायक घटनेचा व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@Rahulkanaujiy32'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''यूपीच्या गाझीपूरमध्ये गंगा नदीत आंघोळ करताना चार वर्षांच्या मुलीचा बुडून मृत्यू, काकू बनवत राहिली व्हिडिओ...पहा व्हिडिओ..या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे'', असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी पाहिला आहे शिवाय अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यजूरने लिहिले आहे की,''किती धक्कादायक घटना आहे'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''खुप वाईट झाले''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT