Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धावती ट्रेन पकडताना तोल गेला, पाय घसरले अन्... घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Shocking Video: सोशल मीडियावर एका रेल्वे प्रवाशाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्यात त्याला धावती ट्रेन पकडण महागात पडलेले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतात ट्रेन मार्गाचे मोठे जाळे आहे. दर मिनिटाला लाखोच्या संख्येने प्रवाशी ट्रेनने प्रवास करत असतात. मात्र ट्रेनने प्रवास करताना अनेकांना जीव गमवावा लागतो. अनेकदा रेल्वे अपघातात प्रवाशांना त्यांच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला आहे. व्हायरल सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपल्याला याचे फुटेज पाहायला मिळतात. सध्या असाच एका रेल्वे प्रवाशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात धावती ट्रेन पकडणे त्याला महागात पडलेले आहे.

सोशल (Social) मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कायम जगभरातील घटना काही क्षणात समजतात. मग या घटनेत अनेकदा अपघांताच्या घटना असतात. अपघाताचे व्हायरल फुटेज पाहून आपल्या प्रत्येकाला भिती वाटते. परंतू सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही अत्यंत थरारक (Thrilling) अपघाताचा आहे. सध्या या व्हिडिओची (Video) सर्वत्र चर्चा होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, सर्व परिसर तुम्हाला रेल्वे स्टेशनवरील दिसत आहे. मग काही वेळात या रेल्वे स्टेशनवरुन एक एक्सप्रेस ट्रेन जाताना दिसून येते. मात्र व्हिडिओ जसा पुढे जाईल तसे दिसत आहे की,एक व्यक्ती धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतू धावती ट्रेन पकडण्याच्या नादात त्याचा तोल जातो आणि रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये पडतो. सर्व घटना तेथिल एका प्रवाशाच्या मोबाईमध्ये कैद झालेली आहे.

व्हायरल फुटेज हे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून ते ''@arslanxx_siddiqui'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेले आहे. व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही. मात्र व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये''तुम्ही अशी चुक करु नका'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओला आतापर्यंत ४६ हजारपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पसंत केले ला असून तो मोठ्या संख्येने पाहिलाही जात आहे.

प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेटकऱ्यांनी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहून अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेटबॉक्समध्ये लिहिले आहे की,'वारंवार असे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' नक्की खरंच झालं आहे का हे'' तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''कुठे घडलं आहे हे'', अशा अनेक प्रतिक्रिया व्हायरल व्हिडिओ पाहून येत आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

Maharashtra Live News Update : चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT