Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भर मांडवात नेमके काय घडले? लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर VIRAL

Wedding Funny Video: सध्या एका लग्नाच्या कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात भरमांडवात अतिशय गमतीदार गोष्ट घडली. नेमके काय घडले असेल ते एकदा प्रत्येकाने व्हायरल व्हिडिओत पहावे.

Tanvi Pol

Wedding Viral Video: सध्या सर्वत्र लग्नकार्य सुरु आहे. सोशल मीडियावर पाहावे तेव्हा विविध लग्नातील व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला अनेक गमतीदार गोष्टीही पाहण्यासाठी मिळतात, त्यातच पुन्हा एकदा अशाच एका लग्नातील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात भर लग्नात भडजींचा रुद्र अवतावर पाहण्यासाठी मिळाला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लग्नातील मोहाळ दिसत आहे. त्यात मांडवात मोठ्या प्रमाणात वर्‍हाडी मंडळी दिसत असून त्यात मांडवात त्या क्षणी नवरा-नवरी सप्तपदी घेत आहेत तर त्यांच्या बाजूला भडजी आहेत. काही वेळात सप्तपदी सुरु असताना नवरा-नवरीचे मित्र तिथे असतात ते हातीतील फुल घेऊन गंमतीत नवरदेवाला मारत असतात, काही मिनिटे त्यांची गंमत सुरु असते. मात्र ती फुल मारत असताना काही फुल तिथे असलेले भडजींनाही लागत असतात, त्यामुळे भडजींना राग येऊन भडजी हातातील फुलांचे ताट घेऊन त्या मुलांवर फेकतात. सर्व गमतीदार व्हिडिओत कॅमेऱ्याक कैद झाला आहे.

सध्या या व्हिडिओला तब्बल १ लाखहून अधिकचे व्ह्यूज मिळाले असून असंख्य लाईक्स मिळाले आहे. सध्या हा व्हिडिओ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@GaurangBhardwa1'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. मात्र सोशल मीडियावर यापूर्वीही अशा अनेक गमतीदार गोष्टीचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''पंडित यांनी बरोबर केले'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''कॅमेऱ्यात आजकाल मस्त घटना कैद होतात'',अशा प्रकारे जास्तीत जास्त गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT