Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे...; भरमंडपात नवरीचा खुलासा, VIDEO व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Wedding Viral Video :

लग्न म्हटल्यावर डान्स, गाणे, मज्जा-मस्ती केली जाते. लग्नात सर्वजण खूप जास्त आनंदी असतात. परंतु हे लग्न जर मनाविरुद्ध होत असेल तर खूप नुकसान होऊ शकते. लग्न करताना नेहमी नवरा आणि नवरी दोघांचीही परवानगी घ्यायला हवी. त्यांचा होकार असल्यास लग्न करावे. परंतु मनाविरुद्ध लग्न केल्यावर काय होते? याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कधी मनाविरुद्ध लग्न झाले तर काय होईल याचा विचारदेखील करु शकत नाही. असाच एका लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नवरीने भरमंडपात लग्न करण्यास नकार दिला आहे.

लग्नात नवरा-नवरी एकमेकांना सात जन्म साथ देण्याचे वचन देतात. मात्र, एका लग्नात मुलीने भर लग्नात मुलगा पसंत नसल्याचे सांगत नकार दिला आहे. त्यानंतर हे लग्न मोडते. याच आगवेगळ्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत लग्नाचा मंडप दिसत आहे. मंडपात नवरा- नवरी दोघेही तयार होऊन आले आहेत. परंतु लग्न करण्याआधीच नवरी होणाऱ्या नवऱ्याला सांगते की, मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत आहे, जबरदस्तीने मी हे लग्न करु शकत नाही. त्यानंतर नवरा तिला खेचत स्टेजवर नेताना दिसत आहे. परंतु, नवरी मात्र काही जात नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी नवरीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे तर अनेकांनी हे खूप वाईट असल्याचे म्हटले आहे. 'मी मुलींना हात जोडून विनंती करतो की, जर तुम्हाला ते आवडत नसेल तर मला आधीच सांगा, अशा प्रकारे कोणत्याही मुलाचा अपमान करू नका' अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

SCROLL FOR NEXT