couple kissed wrong partner at wedding saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: माझा नवरा, तुझी बायको! पार्टनर समजून दुसऱ्याच महिलेला केलं Kiss; व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्यावर हात माराल

couple kissed wrong partner at wedding: लग्नाच्या स्टेजवर घडलेला मजेशीर गोंधळ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये चुकीच्या जोडीदाराला किस केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

लग्न म्हटलं की अनेक गोष्टी किंवा मजेशीर किस्से हे घडतातच. मात्र आम्ही तुम्हाला आज एक अशी घटना सांगणार आहोत जी तुम्ही कधी ऐकलीही नसेल किंवा पाहिलीही नसेल. लग्नात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झालाय.

लग्नसमारंभातील एका अनपेक्षित आणि मजेशीर क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. आनंदाच्या वातावरणात झालेल्या छोट्याशा गोंधळामुळे दोन पुरुषांनी चुकून एकमेकांच्या पत्नीला किस केल्याचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच मोठं आश्चर्य वाटलंय. काही लोकांना तर हा व्हिडीओ पाहून हसूच आवरत नाहीये.

सोशल मिडीयावर व्हायरल झाला व्हिडीओ

व्हायरल क्लिपमध्ये लग्नाच्या स्टेजवर दोन कपल एकत्र उभं असल्याचं दिसतंय. वातावरण उत्साहाचं असून सर्वजण सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसून येतायत. त्याच वेळी दोन्ही पुरुष एकाच क्षणी पुढे येतात आणि स्वतःच्या जोडीदाराऐवजी शेजारी उभ्या असलेल्या महिलेला किस करतात.

यावेळी लग्नाला आलेली पाहुणे मंडळी देखील गोंधळात पडतात. मात्र लगेचच सर्वजण हसू लागतात. यामध्ये असलेल्या जोडप्यांनीही हा प्रकार हसतखेळत घेतल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय.

हा व्हिडीओ सर्वप्रथम Instagram रील्सवर पोस्ट झाल्यानंतर वेगाने शेअर होऊ लागला. त्यानंतर X वरही तो ट्रेंडमध्ये आला. काही तासांतच लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स मिळाल्या.

युजर्सच्या विविध प्रतिक्रिया

या व्हिडीओवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच मजेशरी आहेत. एका युजरने लिहिलंय की, लग्नात जास्त उत्साह कधी कधी महागात पडतो! तर दुसऱ्याने कमेंट केली, हा क्षण आयुष्यभर लक्षात राहणार आहे. आणखी एका कमेंटमध्ये म्हटलंय की, हा किती मोठा ब्लंडर आहे...लोकं अशी कशी वागू शकतात. या व्हिडीओ नेमका कुठचा आहे याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Jayanti 2026: 'या' कलाकारांनी चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका केली अजरामर

Desk Job Risks: 8 तास डेस्क जॉब केल्याने तरुणांमध्ये वाढतोय 'हा' आजार, आताच करा हे बदल, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Live News Update: विलीनिकरणार कोणतीही चर्चा होणार नाही - प्रफुल्ल पटेल

Brain Strok Warning: ब्रेन स्ट्रोक कसा ओळखायचा? 'ही' लक्षणं झोपेत दिसतात, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Shocking: बंजी जम्पिंग करताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, मानेचं हाड तुटलं नंतर...; थरारक VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT