Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: अबब...! तरुणीच्या डोक्यावर चक्क वेटोळे मारुन बसला साप; VIDEO व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला कायम अनेक पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. मात्र तुम्ही कधी पाळीव प्राण्यांमध्ये साप या भितीदायक प्राण्याला पाळले आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shocking Snake Video: साप म्हटलं की आपल्यापैंकी प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडतो. मात्र हेच साप कुणाच्या घरातील पाळीव प्राणी असतील तर? याचा विचार करुन भयानक वाटत आहे. पंरतू सोशल मीडियावर असाच काहीसा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी भल्यामोठ्या आणि भयानक सापांना अंगा खांद्यावर बसवलेले आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर तूफान चर्चा होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला एकापोठापाठ अनेक व्यक्ती दिसून येतील, ज्यांच्या पाठीवर साप आहे किंवा त्यांच्या अंगावर साप आहे. मात्र त्याना अजिबात कोणतीही भिती वाटत नाही. व्हायरल होत असलेला व्हिडिओ जगभरातील अनेक देशातील असलेला दिसून येत आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत सुरुवात एक तरुणी आहे जी ट्रेनमध्ये बसलेली आहे, जिच्या आजूबाजूला अनेक प्रवाशी आहे. मात्र तरुणीकडे नीट पाहिल्यानंतर चक्क तिच्या डोक्यावर एक भलामोठा कोब्रा साप वेटोळे घालून बसलेला दिसतोय. एवढेच नाही तर पुढे व्हिडिओ एकापोठापाठ अनेक तरुण आहेत ज्यांच्याकडे अर्थाच त्यांच्या अंगावर साप दिसून येत आहे. सर्व व्हिडिओ या तरुणांच्या आसपास असलेल्या व्यक्तींनी मोबाईलमध्ये रिकॉर्ड केलेले आहे.

पाळीव सापांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील '@doug_omurwa' या अकाउंटवर शेअर केलेला आहे. व्हिडिओ शेअर करत ''जेव्हा तुम्ही सापाला पाळीव प्राणी म्हणून ठेवता'' असे कॅप्शन लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ साधारण एका महिन्याआधीचा असून आतापर्यंत व्हिडिओला सतरा हजरा नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहेत तर अनेक व्ह्यूज आलेले आहे.

एवढं काय तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''हे इतके भितीदायक आहे की सार्वजनिक वाहतुकीत परवानगी दिली जाऊ नये,जी लहान मुलांना साप चावल्यास काय होईल'' तर अजून एका यूजरने लिहिले,''मानसिक आजार असलेल्या लोकांसारखे नाही ज्यांना डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता आहे'' अशा गमतीदार तर आश्चर्यजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT