Dance Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Viral Video: काकूंचा विषय हार्ड! ''काळी बिंदी काळी कुर्ती…''या गाण्यावर काकूंचा नाद खुळा डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Trending Video: सोशल मीडियावर सध्या एक डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये खूप पसंतील आलेला आहे. हा व्हिडिओ कोणत्याही काका किंवा चिमुकल्यांना नसून एका काकूंचा आहे. तुम्हीही एकदा डान्स व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Viral Dance Reel: नुकताच सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. काळी बिंदी काळी कुर्ती या सुपरहिट मराठी गाण्यावर एका काकूने असा ठसकेबाज आणि जोशात डान्स केला आहे की तो पाहणाऱ्याचे डोळे थक्क झालेत. वयाचा विचार न करता काकू जेव्हढ्या आत्मविश्वासाने आणि उत्साहाने थिरकल्या आहेत, ते पाहून बऱ्याचजणांनी त्यांना 'डान्सिंग क्वीन’चं नाव दिलं आहे.

वय म्हणजे फक्त एक आकडा!

व्हायरल (Viral Video) होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मध्यमवयीन काकू साध्या पेहरावात, चेहऱ्यावर काळी ठसठशीत बिंदी लावलेल्या आहेत. काकू एका हळदी कार्यक्रमात गेल्या असून तिथे काळी बिंदी काळी कुर्ती या गाण्यावर दिलखुलास डान्स करत आहेत. अंगात एक वेगळीच एनर्जी असलेला डान्स, त्यावर त्यांची हावभाव, हास्य आणि सहजतेनं केलेली प्रत्येक स्टेप पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत.

सोशल मीडियावर काकूंची धूम

या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. "काकूचा आत्मविश्वास अफलातून आहे", "यांना पाहूनच सकारात्मक ऊर्जा मिळते", "हेच तर खरे सेलिब्रिटी!" अशा प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ sauryaa301 या इन्स्टाग्रा अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

जर अजून तुम्ही काकूंचा काळी बिंदी काळी कुर्ती या गाण्यावरील डान्स(Dance Video) पाहिल नसेल, तर एकदा आवर्जून नक्की पाहा. हा व्हायरल व्हिडिओ तुमचं मन प्रसन्न करेल, चेहऱ्यावर हसू आणेल शिवाय कदाचित तुम्हालाही एखादा रील तयार करायला प्रेरणा देईल.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT