Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: खतरनाक! वायरमन कनेक्शन तोडायला खांबावर चढला, महिलेनं काठी घेत दिली धमकी, दोघांच्या बाचाबाचीचा व्हिडीओ व्हायरल

Funny Viral Video: सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती घरातील विज कनेक्शन वाचवण्यासाठी थेट वायरमनला मारण्यासाठी जात असते. नक्की पुढे काय होते ते एकदा व्हिडिओत पहा.

Tanvi Pol

Electrician vs Woman: अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभुत गरजा समजल्या जातात, मात्र गेल्या काही वर्षापासून लाईटही मानवाची महत्त्वाची गरज बनली आहे. एक दिवस लाईट नसल्यास मोठीही काम अडकून जातात. जर एक दिवस लाईट गेली तर आपण अनेक प्रयत्न करुन ती लाईट परत आणतो अनेकदा इलेक्ट्रीशियनलाही घरी बोलावतो. सध्या या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असून नेटकरी पोट धरुन हसत आहे.

सोशल मीडियावर आपण अनेकदा घरातील लाईट गेली असल्यास अनेकांनी केलेले हटके जुगाड पाहतो,मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका महिलेने घरातील विज कापू नये म्हणून थेट इलेक्ट्रीशियनशी भिडली आहे. व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओ तुम्ही नक्की एकदा पहा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक इलेक्ट्रीशियन विजेच्या खांबावर वायर कापण्यासाठी चढलेला दिसत आहे, मात्र त्याच्या खाली एका खांबावर एक महिला त्याला मारण्यासाठी चढते आणि त्याला वायर कापण्यापासून अडवत असते, मात्र महिलेला घाबरून तो इलेक्ट्रीशियन काहीही करत नाही, मात्र महिलेला खालून एक व्यक्ती सांगत असतो की,''विज वायर कापलेली नाही तु खाली ये'',त्यानंतर महिला रागातच खाली येते.

महिलेचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस आलेला आहे त्यातून अनेक यूजर्संनी मोठ्या प्रमाणात गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या असून हा व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र मोठ्या संख्येने लाईक्स आणि व्ह्यूज व्हिडिओला मिळत आहे.

टीप : महिलेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

SCROLL FOR NEXT