व्हायरल न्यूज

Viral Video: धक्कादायक! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, दुसरा वाचवण्यासाठी पळाला पण...; थरारक CCTV व्हिडीओ व्हायरल

Viral Cctv Footage: सोशल मीडियावर दररोज अनेक अपघांताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र त्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहून अगांवर काटा येतो. सध्या बिबिट्याच्या हल्ल्याचा एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात बिबट्याने एका बाहेर असलेल्या कुत्र्यावर हल्ला केलेला आहे. सध्या या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या चर्चेत आलेला आहे.

व्हायरल होत असलेली संपूर्ण घटना नारायणगावाजवळील असलेल्या वारुळवाडी येथील आहे. जिथे रात्रीच्या सुमारास दोन कुत्रे फिरत होते. मात्र शिकारीसाठी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने एका त्यांच्या पैकी एका कुत्र्यावर झडप टाकून कुत्र्याला घेऊन गेला. सर्व हल्ला दुसऱ्या कुत्र्याने पाहिला. मात्र काही क्षणात सर्व घटना घडल्याने दुसऱ्या घाबरलेल्या कुत्र्याला काहीच करता आले नाही. ही सर्व धक्कादायक घटना घराबाहेरील असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

व्हायरल सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@TanviPol116027''या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात पाहिला गेलेला आहे तर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. गेल्या काही वर्षात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. मात्र या घटनेनंतर गावकऱ्यांनी काही तरी सुरक्षा पाहावी याची मागणी होत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT