Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: वाह रे आजी! नातवाला सोबत घेऊन ९५ वर्षीय आजींनी चालवली कार; पाहा ड्रायव्हिंगचा VIDEO

Old Woman Viral Video: आजीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय,ज्यात त्या एका नातवाने आपल्या आजींची राहिलेली इच्छा पूर्ण करण्यास मदत केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

95 Years Old Woman Car Driving

वय हा फक्त एक सर्वसाधारण एक आकडा असतो. या वाक्याचा खरा अर्थ पटवून देणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आवड आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला वयाची मर्यादा आड येत नाही. याचा प्रयत्न दाखवणाका एका ९५वर्षीय आजीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय,ज्यात त्या एका नातवाने आपल्या आजींची राहिलेली इच्छा पूर्ण करण्यास मदत केली आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर याआधी अनेक वयोरुद्ध महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ,ज्यात कोणी आजी जिममध्ये व्यायाम करत असतात तर कधी स्टंट करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला दिसते की, एक नातू आपल्या आजीची तिच्या आयुष्यातील राहिलीली गाडी चालवण्याची इच्छा आणि आवड पूर्ण करतो. त्यासाठी नातंवाने आजीची चक्क तिच्या आवडीसाठी कार चालवण्यासाठी दिली आहे.आजी ड्रायव्हिंग सीटवर बसलेली आहे.आजीने निळ्या रंगाची साडी नेसलेली आहेत तर त्यावर लाल रंगाचा स्वेटर परिधान केलेला आहे.

तिचा नातू तिच्या बाजूच्या सीटवर बसून सर्व व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करत आहे तसेच आजी ड्रायव्हिंग करताना नातूं तिच्याशी संवाद साधत आहे. त्यामध्ये तिला विचारतो की, आजी तुझी अजून कोणती इच्छा अपू्र्ण आहे तसेच तुला अजून काय करायचे आहे,त्यावर आजी त्याला सांगते की मला अजून बंदूक चालवण्याची इच्छा आहे. त्यावर नातूं हसतो. यात कारचा स्पीडही अतिशय कमी आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाचा वर्षाव केला आहे. त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,' खूपच गोड' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'मस्तच आजी' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हिडिओवर मिळत आहेत.आज्जीच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत असून हजारोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : लॉजच्या बंद रूममध्ये मुली नको त्या अवस्थेत, पोलिसांनी छापा टाकताच उघडं पडलं रॅकेट; पुण्यातील घटना

High Sugar Fruits Avoid In Diabetes: डायबिटीज आहे? मग चुकूनही खाऊ नका 'ही' ५ फळे; साखरेची पातळी अचानक वाढेल

Sukanya Samriddhi Yojana: मुलींसाठी खास योजना! २१ वर्षांची झाल्यानंतर मिळणार ७१.८२ लाख रुपये; कॅल्क्युलेशन वाचा

LPG Mobile Update: LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ...तर तुमचा गॅस कनेक्शन होणार बंद, १० मिनिटांत घरबसल्या करा हे काम

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाट उतरताना मिनी बस उलटली, मंकी हिल परिसरात अपघात

SCROLL FOR NEXT