Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हात तर मुर्खपणा! रीलसाठी रेल्वेचे इंजिन बाईकने ओढण्याचा प्रयत्न; धोकादायक स्टंटचा VIDEO व्हायरल

Stunt Video: सोशल मीडियावर एका तरुणाचा स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात थेट स्टंट करण्यासाठी तरुण रेल्वेच्या समोर गेलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. रील बनवणे हा जरी मनोरंजनाचा विषय असला तरी, सध्या याचे तरुणाईला वेड लागलेले आहे. अतिशय धोकादायक ठिकाणी जाऊन रिल्स बनवणे हे खास करुन तरुणांना आवडायला लागले आहे. मात्र यांची हीच आवड त्यांच्यासह इतरांचा जीव धोक्यात घालते. अशातच सोशल मीडियावर एका तरुणाचा रिल्स बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात तरुण थेट रेल्वे रुळावर जाऊन थेट ट्रेनसमोर रील बनवत आहे.

व्हायरल (Viral) व्हिडिओत पाहू शकता की, एक तरुण एका रेल्वे रुळावर चक्क एक बाईक (Bike) घेऊन आलेला आहे. तरुणाने त्याच्या बाईकला एक दोरी बांधून त्या दोरीची दुसरी बाजू ट्रेनच्या इंजिनला बांधली आहे. त्यानतंर तरुण बाईकच्या साहाय्याने रेल्वेच्या इंजिनला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र रेल्वेच्या इंजिनचे वजन बाईकच्या तुलनेने जास्त असल्याने तरुणाचा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही. परंतू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. नेटकऱ्यांना व्हिडिओ @bstvlive या अकाउंटवर पाहता येईल. व्हिडिओ पोस्ट करताना असंख्य व्ह्यूज आणि अनेक लाईक्स व्हिडिओला मिळालेले आहेत. मात्र नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिली असली तरी अनेक संतापजनक (Infuriating) प्रतिक्रिया तरुणाच्या या हरकतीला पाहून दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT