Girl Beaten To Man Saam Tv
व्हायरल न्यूज

Chhatrapati SambhajiNagar: भररस्त्यात तरुणीची दादागिरी; वयस्कर व्यक्तीला मारहाण,भांडण सोडवणाऱ्यांनाही हासाडल्या शिव्या

Girl Beaten To Man In Chhatrapati SambhajiNagar : स्कुटीला धक्का लागला म्हणून एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहारामधील परिसरात घडलीय. विशेष म्हणजे एका मुलीने ही मारहाण केली आहे.

डॉ. माधव सावरगावे

लोकांच्या अंगी सहनशीलतेचा गुण राहिला नाहीये. स्कुटीला धक्का लागला म्हणून एका तरुणीने वयस्कर व्यक्तीला भररस्त्यात मारहाण केलीय. तरुणी व्यक्तीला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये तरुणी व्यक्तीची कॉलर पकडली असल्याचं दिसत आहे. त्यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण करत असल्याचं आपण पाहू शकतो.

ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपासकडे जाणाऱ्या शहानूर मिया दर्गाजवळ घडलीय. केवळ धक्का लागला म्हणून तरुणी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहे. वयस्कर व्यक्तीच्या कानशिलात देखील मारत आहे. तेथे जमलेले लोक तिला समजवत आहेत, मात्र ती तरुणी त्या लोकांनाही शिवीगाळ करतेय. याप्रकरणी कुठल्याही पोलीस ठाण्यामध्ये कोणीही तक्रार दिली नाही.मात्र केवळ धक्का लागला म्हणून गोंधळ घालून शिवीगाळ करणे मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून लोक संताप व्यक्त करीत आहेत.

स्कुटीला गाय धडकली, तरुणी जोरात आपटली

सोशल मीडियावर एका अपघाताच्या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका दुचाकीवरून जाणाऱ्या एका मुलीला गायीने धडक दिली. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्याच्या कडेला काही गायी चालताना दिसत आहे, तर त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक गाय आहे. त्यानंतर ती गाय रस्त्याच्या एका बाजुकडून दुसऱ्या बाजुला जाते. गाय रस्त्यावरून जात असताना एक महिला दुचाकीवरुन येताना दिसतेय. त्यावेळी गाय स्कुटीला धडकते.

धडकेमुळे महिला खाली पडते. त्यानंतर सर्व गायी घाबरुन तिथून पळून जातात. सर्व घटना कुठली आहे हे समजू शकलेले नाहीये. मात्र ती घटना रस्त्याच्या कडेला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झालीय. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स अर्थात ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @gharkekalesh या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ २६ ऑक्टोबर रोजी पोस्ट केल्यानंतर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी पाहिला आहे तर अनेकांनी बऱ्याच प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT