Mumbai Ac Local Viral Video: लोकल म्हणजे मुंंबईची लाईफलाईन.. मुंबईकरांच्या दिवसाची सुरूवात आणि रात्री परतीचा प्रवासही याच लोकलमधून होतो. त्यामुळे प्रत्येक मुंबईकरांच्या अनेक आठवणी या लोकलशी जोडलेल्या आहेत.
मुंबईची लोकल जितकी चांगल्या कारणांसाठी ओळखली जाते, तितकेच त्यामधील अनेक मजेशीर किस्सेही सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. कधी जोरदार हाणामारीमुळे, तर कधी जबरदस्त डान्समुळे मुंबई लोकलची चर्चा होत असते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सीटवरुन दोन महिलांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) तसेच मुंबईच्या लोकलमधील अनेक व्हायरल व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमधील महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ समोर आले होते, ज्याची चांगलीच चर्चा रंगली होती. सध्या मुंबईच्या एसी लोकलमधील असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये बसण्याच्या सीटवरुन दोन महिलांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे. बोलण्यावरुन सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे थेट तुफान हाणामारीत रुपांतर झाले. (Latest Marathi News)
मुंबईच्या सामान्य लोकलमधील भांडणाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण सध्या एसी लोकलमधील महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सीटवरुन सुरू झालेला हा वाद थेट हाणामारीपर्यंत गेला. इंग्रजीमधून हा वाद सुरू असला तरी त्यांचा स्वॅग मात्र एकदम देसी आहे.
धक्कादायक बाब म्हणजे एक मुलगी थेट महिलेच्या मांडीवर बसण्याचाही प्रयत्न करताना या व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसत आहे. दोन महिला त्यांची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांनाही व्हिडिओमधील मुलीने चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसत आहे.
दरम्यान, रोड्स ऑफ मुंबई अकांटवरुन शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या भांडणा पेक्षा सामान्य लोकलमधील वादच परवडला अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर आणखी काही जणांनी एसीमधील लोकही अशी भांडतात का म्हणत महिलांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.