Animal Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: अबब..! हिंस्र लांडग्यांच्या झुंडीत सापडली महिला; पुढे जे घडलं त्याने स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Woman Viral Video: सोशल मीडिया हे असं माध्यम आहे ज्याठिकाणी एखादा फोटो ,व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल होतो.या व्हायरल व्हिडिओंमध्ये प्राण्यांचे देखील व्हिडिओ असतात.सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला चक्क हिंस्र अशा लांडग्याच्या झुंडीतून आरामात जाताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Animal Viral Video

सोशल मीडिया हे असं माध्यम आहे ज्याठिकाणी एखादा फोटो ,व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल होतो. या व्हायरल व्हिडिओंमध्ये प्राण्यांचे देखील व्हिडिओ असतात. यामधील काही व्हिडिओ कधी प्राण्यांच्या भांडणांचे असतात तर कधीकधी आपल्याला पोट धरून हसायला लावणारे असतात.पण सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला चक्क हिंस्र अशा लांडग्याच्या झुंडीतून आरामात जाताना दिसत आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लांडग्यांच्या झुंडीत सापडली महिला

या व्हिडिओत सुरूवातीस आपल्याला रात्रीच्या वेळत काही लांडग्याचा झुंड मोकळ्या जागी बसलेला दिसतोय. इकडून तिकडे हिंस्र असणारे लांडगे वावरत दिसत आहेत. तेवढ्यातच तिथून एक महिला न घाबरता जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिला जात असताना लांडगे तिला जराही त्रास देत नाही तसंच महिलाही यांना घाबरत नाही. उलट महिला जात असताना लांडगे तिच्या वाटेतून बाजूला सरकत आहेत.

बिनधास्त महिलेचा व्हायरल व्हिडिओ हा @BrutaINature1 या एक्स(ट्वीटर) अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तिथं महिलेसोबत असणाऱ्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. नेमका व्हिडिओ कुठला आहे हे समजले नाही.आजपर्यंत आपण अनेकदा प्राणी आणि माणसांमधील प्रेमाचे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. त्यात कधी चक्क सिंहाचा मालकाप्रती असलेला लगावही बघितला आहे. असे व्हिडिओपाहून डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते.

ट्वीटर (एक्स)वर पोस्ट केलेल्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. तसंच लाखोंच्या घरात हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. हजारो लाईक्सही मिळाले आहेत. अनेकांना घरात साधी पाल तसंत झुरळ जरी दिसलं तरी भीती वाटते.पण व्हिडिओतील महिला चक्क लांडग्याचा झुंडातुन जात आहे.त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी या महिलेच्या बिनधास्तपणाचे कौतुक केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Maharashtra News Live Update:घोडबंदर रोडवरील काँक्रिटीकरणामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 25 किमीपर्यंत वाहतूक कोंडी

Skin Care: फक्त 20 मिनिटांत मिळवा सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन; घरी तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहा

मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; सरकारकडून पीडितांना 40 लाखांची मदत

SCROLL FOR NEXT