Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बायकोसाठी मोबाईल घ्यायला गेला, एक्स गर्लफ्रेंड दुकानात आली; चारचौघात चोपला

Fighting Viral Video: सोशल मीडियावर दरवेळी अनेक हाणामारीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. कधी व्हिडिओ नवरा-बायकोच्या भाडंणाचे असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

Tanvi Pol

Girlfriend Beats Boyfriend: सोशल मीडियावर बऱ्याचदा अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. बरेच व्हिडिओ मनोरंजक असतात, तर काही धक्कादायक. मात्र हल्ली अशा काही गोष्टी पाहण्यासाठी मिळतात ज्या एखाद्या चित्रपटात घडाव्यात तशाच वाटतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे एका व्यक्तीला त्याच्या भूतकाळाच्या गोष्टीमुळे भररस्त्यात मार पडला आहे. हा सर्व प्रकार एका मोबाईल दुकानात घडा असून त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

घडले असे की एक व्यक्ती त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी (Wife) नवा मोबाईल खरेदी करण्यासाठी जातो. दुकानात गेल्यानंतर तो व्यक्ती विविध प्रकारच्या मॉडेल्सचे मोबाईल पाहतो. सगळं काही सुरळीत सुरु होते. मात्र अचानक त्या मोबाईलच्या दुकानात त्या व्यक्तीची एक्स गर्लफ्रेंडमध्ये येते आणि सर्वच वातावरण बदलतं

हाणामारीचा प्रकार कसा घडला?

तरुणी त्या व्यक्तीला पाहताच तुफान आरडाओरडा सुरू करते आणि “तू मला विसरलास का? मला वचन दिलं होतंस शिवाय लग्न करशील असंही सांगितलं होतंस आणि आता होणाऱ्या बायकोसाठी मोबाईल घेतोयस?” असा जाब विचारता व्हिडिओ दिसत आहे. तरुणीने सांगितलेल्या या गोष्टीनंतर दुकानातील कर्मचारी आणि अनेक ग्राहकही हैराण झालेले व्हिडिओत दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल(Viral) झालेला आहे. काही दिवसात व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''एकाच वेळी दोन व्यक्तीवर प्रेम केलंत,आता परिणाम भोग" तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''चांगल चोपला पाहिजे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या तुम्ही पाहू शकता.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT