Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मम्मी रॉक्स! पापडाची भाजी कशी करायची? रोबोट आलियाची बोलती बंद, दुबईतला VIDEO व्हायरल!

Funny Video: सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात महिला एक रोबोटला पापड भाजी कशी करायची ते विचारते, मात्र पुढे काय झाले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Viral Video News: गेल्या काही वर्षात भारतात प्रत्येक क्षेत्रात मोठी प्रगती झालेली आहे. मानवी कामगार कमी झाले असून त्याजागी रोबोटने त्यांची जागा घेतलेली आहे. घरातील लहान कामापासून ते प्रत्येक काम रोबोटच्या साहाय्याने आता करता येते. सोशल मीडियावर आपण त्या संबंधित अनेक व्हिडिओ पाहत असतो. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहून प्रत्येकजण हसू आवरणार नाही. ज्यात एका महिलेने एका रोबोटला साधारण स्वयंपाकाबाबत प्रश्न विचारला मात्र तो त्या रोबोटला देता नाही आला.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक महिला दिसत आहे. जी एका मोठ्या हॉलमध्ये उभी आहे. ज्या महिलेसमोर एक रोबोट उभे आहे. व्हिडिओ पाहिले तर रोबोटच्या समोर माईक दिले आहे ज्या मार्फत तुम्ही त्या रोबोटला काहीही प्रश्न विचारु शकता. त्यामुळे ही महिलाही(Women) रोबोटला ''पापडची भाजी कशी बनवावी'' हा प्रश्न विचारते मात्र रोबोट प्रश्न ऐकताच गोंधळून जातो. व्हायरल होत असलेल्या रोबोटचे नाव आलिया आहे. सर्व व्हिडिओ त्या महिलेच्या मुलाचे कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.

व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '@kanhaiyakachhawa' या अकाउंटवर काही दिवसापूर्वी पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''असा प्रश्न आईने विचारल्यावर रोबोट आलिया पूर्णपणे गोंधळून गेली'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या संख्येने लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

रोबोट आलियाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे. एवढेच नाही तर अनेक प्रतिक्रियाही व्हायरल व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''पापड भाजी कशी बनते ते बिकानेरचे लोक सांगू शकतील'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''म्हणूनच आईशी बोलणे खूप अवघड आहे'' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,''हे यंत्र बनवणाऱ्याची बदनामी झाली'' अशा अनेक गंमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले; मात्र दररोज 'इतक्याच' भाविकांना प्रवेश

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT