Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरेरे! 'रामलीला'मध्ये श्रीराम- रावणामधील युद्धाचा सीन करताना दोघांमध्ये खरोखरच मारामारी झाली, VIDEO व्हायरल

Funny Viral Video: आपल्यापैकी अनेका रामलीला कार्यक्रम माहिती असेल. मात्र याच कार्यक्रमात नक्की काय झाले आणि त्याच्या व्हिडिओ सोशल मीडिआ का व्हायरल होतोय ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Fighting Video: भारतात प्रत्येक गावात आणि शहरात काही सणानिमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. कुठे गणपतीनिमित्ताने आणि नवरात्रीमित्ताने मोठ्या जत्रा भरतात तर कुठे याच जत्रेत अनेक नाटकांचे आयोजन केले जाते. सध्या सोशल मीडियावर एका रामलीला कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे सुरु असलेल्या रामलीला कार्यक्रमात चक्क रावण आणि राम यांच्या घमासाण हाणामारी झालेली आहे. होत असलेली हाणामारी नाटकाचा भाग नसून खरोखर तूफान मारामारी यांच्यात झालेली आहे. सध्या सर्वत्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या चर्चेत आलेला आहे.

नेमके घडले तरी काय?

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील एका गावामधील असल्याचे समजत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिोओत तुम्ही पाहू शकता की, गावात एका ठिकाणी स्टेज बांधलेला आहे. पुढे रामलीला या कथाचे नाटक येथे सुरू आहे. सर्व पात्र आपल्या आपल्या भुमिका योग्यरितीने करत असल्याचे दिसत आहे. ज्यात राम आणि रावण सुद्दा दिसून येत आहे. मात्र काही वेळात राम आणि रावण यांच्या जी नाट्यमय भांडण सुरु होते, तेच वाद खरे सुरु झाले. यांचे वाद इतक्या टोकाला गेले की ते चक्क हाणामारी(Fighting) करण्यास सुरुवात करतात. काही क्षणात अन्य व्यक्ती येऊन त्यांचे वाद मिटवण्याचा मदत करताना दिसून येत आहेत.

'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र एक्सवरील '@MaheshAmravans1' या अकाउंटवर १४ ऑक्टोबर रोजी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच,''रामलीला सादर करताना राम आणि रावण असल्याचे भासवणाऱ्या दोन कलाकारांमध्ये खरी लढत झाली. रावणाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीने रामला स्टेजवरून ढकलून खाली पाडले. परिस्थिती हाणामारीपर्यंत आली'' असे कॅप्शन देण्यात आलेले आहे.

एक्सवर व्हिडिओ पोस्ट होताच लाखोंच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत. व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी बऱ्याच प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कमाल आहे या लोकांची'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काय सुरु आहे नक्की कळना'' तर अनेकांनी विविध गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

Soaking mangoes: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवला जातो?

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT