Viral Video Himachal Pradesh Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : दुर्घटना थोडक्यात टळली, नदीच्या ब्रिजवरून रेल्वे जाताना अचानक पाया कोसळला, थरारक व्हिडिओ व्हायरल

Monsoon : हिमाचल प्रदेशमध्ये रेल्वे पूलाचा पाया पुरात वाहून गेला असताना हजारो प्रवासी असलेली ट्रेन पुलावरून गेल्याने थरारक प्रसंग घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पुढील २४ तासांसाठी हवामान खात्याचा अलर्ट जारी आहे.

Alisha Khedekar

हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धो धो पडणाऱ्या पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटनाही दररोज समोर येत आहेत. अशीच एक घटना कांगडा येथील जम्मू रेल्वे मार्गावर घडली आहे. हजारो प्रवाशांनी भरलेली ट्रेन पुलावरून जात असताना रेल्वे पुलाच्या पायाचा मोठा भाग पाण्यात वाहून गेला असल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर रेल्वेच्या दुरुस्तीचे काम जलद गतीने करण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, दरवर्षी पावसाळ्यात चक्की नदीच्या पुरामुळे नुकसान होते, परंतु यावेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. विमानतळ रस्ता वाहून जाणे आणि रेल्वे पुलाखाली माती सरकणे हा प्रशासनासाठी एक गंभीर इशारा आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, "जर पुलाचे वेळीच संरक्षण करण्यासाठी पावले उचलली गेली नाहीत तर येत्या काळात वाहतुकीवर पूर्णपणे परिणाम होऊ शकतो."

हिमाचल प्रदेशमध्ये हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी अलर्ट जारी केला आहे . जर पाऊस असाच सुरू राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. प्रशासनाने लोकांना नद्या आणि ओढ्यांच्या काठावर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य त्वरित सुरू करता यावे यासाठी बचाव पथकालाही सतर्क करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

SCROLL FOR NEXT