Viral Video (X Twitter)
व्हायरल न्यूज

Viral Video: टोल कर्मचाऱ्याला घेऊन चालकानं सुसाट पळवला ट्रक; टोलसाठी गाडीला लटकून चालकाशी घातली हुज्जत

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो खूपच भीतीदायक आहे.

Bharat Jadhav

viral video:

दररोज सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो. तर काही व्हिडिओ पाहून संताप येत असतो. त्यातील काही व्हिडिओ पाहून आपला थरकाप उडत असतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो खूपच भीतीदायक आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ट्रकच्या दरवाजाला लटकलेला दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्या विनंतीनंतरही ट्रक चालक गाडी थांबवत नाही. (Latest News)

व्हायरल व्हिडिओनुसार, ट्रक चालकानं टोल भरला नाही, यामुळे टोल नाक्यावरील कर्मचारी टोल वसूल करण्यासाठी ट्रकच्या कॅबिनला लटकला. परंतु चालकानं ट्रक न थांबवता कर्मचाऱ्याला घेऊन तो अजून सुसाट गाडी पळवू लागल्याचं दिसत आहे. चालकाने या टोल कर्मचाऱ्याचा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

साम डिजिटलकडे आलेला हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून कुंगफू पांडे नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही लोक पाहू शकतात की, टोल नाक्यावर काम करणारा कर्मचारी चालकाच्या कॅबिनला लटकला आहे. हा कर्मचारी ट्रक चालकाला ट्रक थांबवण्यास सांगत आहे. चालक आणि कर्मचाऱ्यामध्ये टोलवरून एकमेकांशी हुज्जत घालत आहेत.

तू गाडीवर चोरी करण्यासाठी लटकला आहेस का, थांब तुला पोलीस स्टेशनला नेतो. तू जसा लटकला आहेस ना तसाच लटकून रहा तुझा व्हिडिओ बनवत आहे.

तुम्ही पाहू शकता की, ट्रकच्या कॅबिनला लटकलेला व्यक्ती तुम्हाला तुमचे वाहनाचे टोल द्या, असे सांगत आहे. यावर उत्तर देताना वाहनचालक म्हणतो की, कोणता टोल. या ट्रकला आरटीओ सुद्धा थांबवत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर कुंगफू पांडे नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय.

व्हिडिओ शेअर करताना त्याला कॅप्शन दिले आहे. ट्रक चालकाने टोल न भरल्याने हा प्रकार घडला आहे असं लिहिलंय. सोशल मीडिआवर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका व्यक्तीने लिहिले हा ड्रायव्हर खूप हेवी निघाला. तर दुसर्‍या व्यक्तीने लिहिले हे बरोबर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT