Viral Thieves Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Thieves Video : चोरांना पाहून मित्र पळत सुटला; एकाकी पडलेल्या तरुणीला बघून चोराचं हृदयही तुटलं, पुढे काय घडलं?

Viral News : चोराचं अचानक मतपरिवर्तन झाल्याने त्याने ती बॅग तरुणीला परतही केली.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video News : चोरीच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. चोरी करताना चोर कुठलीही दया माया दाखवत नाही. चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये तर अनेकदा पीडिताना इजा देखील होते. एका चोरट्यांने अशाच पद्धतीने तरुणीची बॅग चोरली. मात्र अचानक मतपरिवर्तन झाल्याने त्याने ती बॅग तिला परतही केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये एक मुलगी आणि मुलगा रस्त्यावरून चालताना दिसत आहे. दरम्यान मागून बाईकवरुन दोन चोरटे येतात. एक चोर या जोडप्याच्या जवळ येतो आणि धमकावून तरुणीची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करतो.

तरुणीसोबतचा मुलगा लगेच हात करुन चोरापासून मागे हटतो. चोर जवळ येतात तरुण तरुणीली सोडून तिथून पळ काढतो. घाबरलेली मुलगी तिची हँडबॅग चोराकडे सुपूर्द करते आणि पळून जाणाऱ्या आपल्या जोडीकाराकडे बघत राहते. (Latest Marathi News)

तरुणीसोबतच्या तरुणाच्या अशा कृत्याने चोर सुद्धा चकीत झाला. त्याला तरुणीची कीव येते आणि तो तिची बॅग पुन्हा तिला देऊन टाकतो. परंतु चोर जाण्यापूर्वी तरुणीला एक सल्लाही देताना दिसला. (Viral Video)

ट्विटरवर अकाऊंटवर शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहितीही अद्याप मिळू शकलेली नाही. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cheese Recipe: घरीच झटपट बनवा बाजारात मिळणार मलईदार टेस्टी चीज, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार, पुणे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

Coconut Water Vs Glucose: नारळ पाणी की ग्लुकोज? कडाक्याच्या उन्हात काय पिणं योग्य? वाचा...

Crime News: सुट्टी नाकारल्याने सुरक्षारक्षकाचं डोकं सटकलं; बँक मॅनेजरच्या छाती घातली गोळी

KDMC News: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटातून निवडून आलेल्या नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT