चोराने काही सेकंदात बुलेट चोरली, चोरीची धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ७ सेकंदाच लॉक तोडलं अन् घरासमोरून बुलेट पळवली, घटना CCTV मध्ये कैद

Video: मुझफ्फरनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका चोराने काही सेकंदात बुलेट चोरून पळ काढला. बुलेट चोरीची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तर प्रदेशात दुचाकी चोरांची दहशत वाढत आहे. विशेषतः मुझफ्फरनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एक चोर काही सेकंदांत दुचाकीचं कुलूप तोडून बाईक लंपास करतो. ही घटना मुझफ्फरनगरमधील सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनच्या हद्दीतील स्वरूप चौकात घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या प्रकारात चोराने काही क्षणांतच रॉयल एनफील्ड बुलेट बाईकचं कुलूप तोडलं आणि बिनधास्त पळ काढला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

बुलेट चोरीच्या प्रकरणात मालकाने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडिताने सांगितले की, चोरांनी त्याच्या कष्टाचे पैसे एका क्षणात पळवून नेले. त्याने पोलिसांकडे तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. पीडिताने पोलिसांना दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोराचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. तसेच त्या परिसरात अनेक वाहने उभी असतानाही चोर थेट बुलेटजवळ येतो. त्याने काही सेकंदांतच बुलेटचे कुलूप एका साधनाने तोडले आणि गाडी घेऊन फरार झाला.

मुझफ्फरनगरमध्ये दुचाकी चोरीची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. चोरट्यांना आता पोलिसांची भीती राहिलेली नसल्याचं दिसत आहे. शहरातील चोर इतके बेधडक झाले आहेत की पोलिसांनाच खुलेआम आव्हान देत आहेत. दुर्दैवाने, चोरीच्या घटना कमी होण्याऐवजी सतत वाढतच चालल्या आहेत.

आता व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युवकाने कंमेंट केली की, “फक्त १५ सेकंदांत कुलूप तोडून बुलेट चोरीला गेली, हे अतिशय धक्कादायक आहे. २-३ लाख रुपयांची दुचाकी इतकी असुरक्षित असावी, ही खरोखरच चिंतेची बाब आहे.” दुसऱ्या एका व्यक्तीने उपरोधाने लिहिले की, “पगार वाढवण्यासाठी कौशल्य लागतं, आणि या चोरांकडे ते कौशल्य नक्कीच आहे!”

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT