Sultanpur Father Death Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापाच्या अंत्ययात्रेत मुलाने लावला बँण्ड, तेराव्याच्या दिवशी डिजेवर नाचला; कारण ऐकून सर्वच अवाक

Sultanpur Father Death Dance Video: उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. येथे एका मुलाने आपल्या बापाच्या निधनावर बँण्ड लावत जल्लोष केला.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशचे सुलतानपूरमध्ये एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलंय. येथे एका मुलाने आपल्या बापाच्या निधनाचा शोक न करता त्यांच्या अंत्ययात्रेसाठी चक्क बँण्ड लावला. इतकेच नाही तर तेराव्याच्या दिवशीही या मुलाने डीजे लावला होता, हे सर्व पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बापाच्या अंत्ययात्रेत बँण्ड लावल्याने गावातील सर्वजण आश्चर्यचकित झाले. विशेष म्हणजे बापाच्या अंत्ययात्रेच्यावेळी मुलगा बेभान होऊन नाचत होता. हे पाहून गावकऱ्यांना मोठा धक्काच बसला.

विशेष म्हणजे यावेळी त्याचे मित्रही त्याच्यासोबत नाचत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ सुलतानपूर जिल्ह्यातील नगर कोतवाली भागातील आहे. नारायणपूर परिसरातील दुर्गापूर परिसरात राहणारे श्रीरामचे वडील राम किशोर मिश्रा यांचे २० दिवसांपूर्वी निधन झाले होते. राम किशोर मिश्राचं आयुष्य ८० वर्ष होतं. मिश्रा यांचे कुटुंब हे समुद्ध कुटुंब आहे, तरीही त्यांच्या नातेवाईकांनी मिश्रा यांच्या निधनानंतर अंत्ययात्रेसाठी बँण्ड लावला.

राम किशोर मिश्रा यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरातून निघाली तेव्हा श्रीराम याने बँड वाजवण्यास सुरुवात केली. अंत्ययात्रेच्या वेळी श्री राम बँडच्या तालावर नाचू लागला. त्याच्यासोबत त्याचे मित्रही नाचू लागले. अंत्ययात्रा बाजारातून जात असताना हे बँण्ड आणि नाचण्याचं दृश्य बाजारातील सर्व नागरिक आश्चर्यचकित झाले होते. विशेष म्हणजे अंत्ययात्रेतील बँण्ड वाजणाऱ्यावर श्रीराम नोटा उधळत होता.

अंत्ययात्रेत बँण्ड वाजवल्यानंतर श्रीराम याने अंत्यसंस्काराच्या मेजवानीच्या वेळी डीजेची व्यवस्था केली होती. मुलगा श्रीराम सह इतर नातेवाईकही शोक न मानता निधनाचा जल्लोष करत होते.

का बँण्ड लावला?

मुलगा श्रीराम बँण्ड लावण्यावर म्हणाला की, मृत्यूही जीवनाचा एक भाग आहे. त्यामुळे आपण निधनाच्या घटनेलाही त्याच पद्धतीने घेतलं पाहिजे. अंत्ययात्रेत आपण रडून मृत व्यक्तीला निरोप दिला तर त्यांच्या आत्म्याला त्रास होत असतो. जो व्यक्ती आपले कर्तव्य करून मरण पावतो तर ते चांगले असते, असेही श्रीराम मिश्रा म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जुलाब होतायेत? मग दहीसोबत मिसळून खा 'हा' १ पदार्थ

Chronic stress effects: सतत तणाव घेण्याची सवय मेंदू आणि शरीरासाठी का ठरते धोकादायक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : महिलेने यात्रेतून खरेदी केली चादर; घरी जाऊन घडी उलगडताच पायाखालची जमीन सरकली, पाहा नक्की काय घडलं?

Pune : पुण्यात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा सापडला ACB च्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT