Husband Hangs Wife From Railing: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका पतीने आपल्या पत्नीशी झालेल्या वादातून संतापाच्या भरात अमानवी वागणूक दिल्याचं दिसतं. रागाच्या भरात पतीने पत्नीला उंच इमारतीच्या रेलिंगवरून लटकवलं आणि त्या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. हे दृश्य पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले आहेत.
या व्हिडिओमध्ये(VIDEO) तुम्हाला एका इमारतीमधून लोकांचा किंचाळण्याचा आवाज सुरुवातीस ऐकू येतो मात्र व्हिडिओच्या पुढे दिसते की, एक महिला उंच इमारतीच्या रेलिंगला लटकली आहे. पण ती लटकलेली नसून तिला तिच्या पतीने रागाच्या भरात लटकवलं आहे. सर्व प्रकार पाहून इमारतीचे लोक बाहेर आले. मात्र कोणीही त्या वेळी तिथे तिच्या मदतीसाठी पोहचलेला दिसून येत नाही.
या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी अशा वागणुकीचा तीव्र निषेध केला आहे. तर काहींनी हे कृत्य खून करण्याच्या प्रयत्नासारखे असल्याचे म्हटले आहे. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यात हा व्हिडिओ एक्सवरील @gharkekalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. या व्हिडिओच्या दिलेल्या कॅप्शनमधून समजते की ही घटना कुठली आहे आणि नेमके कारण काय आहे.
घडलेली ही घटना ऋषिकेशमधील असल्याचे समजत आहे. मात्र याची पुष्टी होऊ शकलेली नाही. सोशल मीडियावर यापूर्वीही पती-पत्नीमधील एक वाद व्हायरल(VIRAL) झाले अनेकदा रस्त्यावर दोघांची हाणामारी तर कधी वाद.मात्र, सध्याचा व्हिडिओ अतिशय भयानक असा आहे.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.