Desi Jugad Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Desi Jugad Viral Video: वा रे पठ्ठ्या! भावाने केला असा देसी जुगाड,भन्नाट करामत पाहून नेटकरीही चक्रावले, पाहा Viral Video

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Desi Jugad Viral Video

भारत असो वा अन्य देश जुगाड करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. सोशल मीडियावर नेहमी एकापेक्षा एक असे भन्नाट जुगाड पाहायला मिळतात. हे जुगाड कधी आश्चर्याने थक्क करणारे असतात, तर कधी डोक्याला हात लावायला भाग पाडतात. आपल्या देशात जसे जुगाड पाहायला मिळतात, तसे जगाच्या पाठीवरही जुगाड करणारे व्यक्ती आहेत हे आपल्याला या व्हिडिओतून दिसले. लोक कधी,कुठे डोके लावतील आणि चमत्कार घडवतील याचा काही नेम नसतो आणि अशा करामती लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच पाहायला मिळतात. अशातच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये एक देशी जुगाड पाहायला मिळाला आहे जो पाहून तुम्ही थक्क व्हाल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ आपल्याला दिसते की, एक व्यक्ती रस्त्यावरच्या सफाईसाठी स्वत: हातामध्ये झाडू घेऊन उतरलेला दिसत नाही, तर त्याने चक्क एक असा जुगाड तयार केला आहे, ज्यात त्याने रस्त्यावरची सफाई करण्यासाठी एका गाडीच्या पाठीमागे गोलाकार फिरणारे यंत्र बसवले आहे. या फिरणाऱ्या यंत्रामध्ये चार मोठ्या आकाराचे झाडू लावलेले आपल्याला दिसत आहे. या जुगाडामुळे कंटाळवाने कामही आणि ज्या कामाला उशीर लागणार आहे ते काम लवकरात लवकर होऊ शकते.

व्हायरल व्हिडिओ हा @TheFigen_या ट्वीटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. नेमका हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकले नाही. रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा जुगाडू व्हिडिओ कैद केला आहे. या व्यक्तीच्या जबरदस्त जुगाडाने नेटकरी मात्र थक्क झाले आहेत. या व्हिडिओला बघून जगात अशी अनेक लोक आहेत जी त्यांची भन्नाट कल्पकता वापरुन असा काही जुगाड करतात ज्याचा आपण कधी विचारही करु शकत नाही असा नक्कीच विचार आपल्याला येतो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला असून या भन्नाट आयडीयाचे कौतुकही केले आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त त्याच्या या भन्नाट जुगाडाचीच चर्चा पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT