Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : आता हे काय नवीन? मुलांच्या अभ्यासाची चिंता मिटली; बाजारात आली HOMEWORK करणारी मशीन; पाहा VIDEO

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,जो प्रत्येक पालकांच्या पसंतीस येत आहे. व्हिडिओत काय आहे ते तुम्हीच पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी शाळेतील मस्तीचे तर कधी गृहपाठावरुन शिक्षकांचा ओरडा किंवा मार खाणारे. शाळेतील अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला आपल्या शाळेची आठवण येतेच. शाळेत न जाण्याचे कारण असेल तर महत्त्वाचे म्हणजे शाळेतील गृहपाठ. शाळेचा गृहपाठ न करण्यासाठी आपल्याला लहानपणी खूप मार खावा लागला असेल,मात्र आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,जो पाहून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा ताण नक्की जाईल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @HasnaZaruriHai या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये''लो भाई अब homework करने वाली मशीन भी या गई'' असे लिहिण्यात आलेले आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक पालकांनी ते अनेक व्यक्तींनी गंमतीदार(funny) प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील पहिला यूजर बोलतो की,'आमच्या वेळी असे का नव्हते''.तर अनेकांनी'आताच्या मुलांना मार नाही मिळणार असा आम्हाला मिळाला''.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) एक वही दिसून येत आहे .या वहीमध्ये काही वाक्य काही वेळात लिहिली जात आहे, मात्र तुम्ही नीट पाहिले तर दिसेल की कोणताहा विद्यार्थ्यी लिहिताना दिसत नाही तर एक मशीन आहे,जी मशीनच वहीमध्ये वाक्य लिहित आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT