Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रीलचा नाद लय वाईट! रीलच्या नादात तरुणीचा पाय घसरून थेट दरीत कोसळली; अंगावर काटा आणणारा VIDEO कॅमेऱ्यात कैद

Shocking Video: दरदिवशी अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात एका महिलेला रिल्स व्हिडिओ बनवणे महागात पडलेले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दररोज मोठ्या संख्येने पर्यटक विविध ठिकाणी फिरायला जात असतात. नवीन ठिकाणी गेल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ काढणे हे सध्या शास्त्र बनलं आहे. मग ते फोटो काढण्यासाठी काहीही करण्यासाठी पर्यटक तयार असतात. मग अशा घटनामधून पर्यटकांचे अपघात होतात. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका पर्यटकाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात रिल्स व्हिडिओ बनवण्याच्या पायी पर्यटकाचा जीव थोडक्यात बचावला आहे.

तरुणाई असो वा वयोरुद्ध नागरिक सर्वांसाठी सोशल मीडिया मनोरंजनाचे साधन ठरत आहे. मात्र हे मनोरंजनाचे साधन त्यांनी जीव गमावणारे साधन केलेले आह. सोशल मीडियाचा वापर मर्यादेपेक्षा अधिक केल्याने अनेकांना जीव गमावावा लागला आहे. सोशल मीडियावर रील (Reel) बनवून प्रसिद्ध जरी होत असले तरी याच रिल्समुळे अनेकांनी जीव (life) गमवावा लागला आहे. या संबंधित असलेलेल अनेक धक्कादायक व्हिडिओही आपण याच सोशल मीडियावर पाहतो. मात्र सध्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल (Viral) झालेला आहे. जी महिला रिल्स व्हिडिओ बनवताना धोकादायक अशा दरीत पडली आहे. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला उंच पर्वत आणि धोकादायक दरी दिसून येत आहे. या सर्व परिसर हिरवाईन सजलेला आहे. मात्र निसर्गाचा आनंद घेयचा मात्र तिथे एक तरुणी आहे. जी दरीच्या एका धोकादायक ठिकाणी रिल्स व्हिडिओ बनवण्यासाठी उभी आहे. ज्यात ती एक ओढणी हातात घेऊन उभी राहते आणि पुढे ती त्याच दरीच्या एका धोकादायक रस्त्यावरुन धावत येते मात्र तोल गेल्याने ती थेट खाली घसरत जाते. तरुणीला खाली पडताना पाहून व्हिडिओ बनवणारी तरुणी ओरडण्यास सुरुवात करते.

प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी पसंती दिलेली आहे मात्र अनेकांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'यांना काय गरज असते'' तर एकापेक्षा अधिक यूजर्संनी संतापजन दाखवणाऱ्या प्रतिक्रिया केलेल्या आहेत.''मात्र संपूर्ण व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अधिकाऱ्यांना मारले, आता फेरीवाले आम्हाला पण मारणार, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची महासभेत विनवणी

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT