Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पाच दिवसांपासून मांजर विहिरीत अडकली, जिवाच्या आकांताने धडपड, पठ्ठ्या १२० फूट खाली उतरला; अन्...

Rescue Operation Video: सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण तरुणाचे कौतुक करत आहे. नक्की काय घडले ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहाच.

Tanvi Pol

Viral Video News: माणुसकी आणि प्राण्यांवरील प्रेमाचे असे असंख्य उदाहरणे वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतात. काही लोक निस्वार्थ भावनेने प्राण्यांची मदत करण्यासाठी कोणतीही जोखीम पत्करतात. मात्र, सध्या एक धाडसी प्रकार नुकताच समोर आला, जिथे एका तरुणाने तब्बल १२० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्याच्या व्हिडिओही सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

पाच दिवसांपासून अडकलेली मांजरची घटना कोणत्या शहरातील किंवा गावातील आहे हे समजू शकलेले नाही.मात्र, या व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुण खोल अशा विहिरीत दोरीच्या साहाय्याने लटकलेला दिसत आहे आणि त्याच्याकडे असलेल्या एका दोरीला मांजर बांधलेली आहे. अशा पद्धतीने अत्यंत खोल विहिरीतून मांजरीला तरुणाने सुखरुप बाहेर काढलेले आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ लोकांनी सोशल मीडियावरही शेअर केला आहे आणि तो वेगाने व्हायरल होत आहे. अनेक लोकांनी या तरुणाच्या साहसाची प्रशंसा केली तर काहींनी त्याला "रिअल हीरो" म्हणत त्याचे कौतुक केले, तर काहींनी प्राण्यांवरील प्रेमाचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले आहे.

सर्व घटनेचा व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या ''newsinsider24x7'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लोकांनी हजारो लाईक्स आलेले असून लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळालेले आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT