Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रिल्सचे वेड! तरुणाचा धावत्या ट्रेनवरून धोकादायक प्रवास; हैराण करणारा VIDEO समोर

Stunt Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा धक्कादायक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. ज्या व्हायरल व्हिडिओत त्या तरुणाने धावत्या ट्रेनच्या छतावर बसून धोकादायक प्रवास केलेला आहे.

Tanvi Pol

Young Man Video: ट्रेनचा प्रवास जिकता सोईस्कर आहे तेवढाच धोकादायकही ठरत आहे. गेल्या काही वर्षात ट्रेनच्या धडकेत असो वा धावत्या ट्रेनमधून पडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे, मात्र असे असूनही अनेक व्यक्ती त्यांच्या निष्काळजीपणामुळे स्वता:चा जीव टांगणीवर ठेवतात. सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एका तरुणाने धावत्या ट्रेनच्या टपावर बसून धोकादायक प्रवास केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक तरुण धावत्या ट्रेनच्या टपावर बसलेला आहे. तरुणाच्या पाठी मागे अजून एक व्यक्ती बसलेला आहे. ट्रेनच्या छतावर बसून त्याने व्हिडिओ शूट केला आहे,ज्यात तो बोलतो की,''खूप धोकादायक(Shocking) यात्रा आहे''. कोणत्याही सेफ्टी शिवाय हा तरुण ट्रेनच्या छतावरुन प्रवास करत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टावरीलच ''rahul_baba_ki_masti'' या अकाउंटवर तीन दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच कॅप्शनमध्ये,''तुम्ही असं करु नका'', असे कॅप्शन लिहिले आहे. व्हिडिओला सध्या लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत असून अनेक लाईक्स मिळाले आहेत.

नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया

तरुणाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण आहे, मात्र त्यातील बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''भावा असं करु नको'' तर काही यूजर्संनी लिहिले आहे की,''हे खूप चुकीचे आहे'' तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग जाणार तिथे रातोरात फुलवल्या आंब्याचा बागा, नेमकं कारण काय?

Bariatric surgery: लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रियेची गरज कधी असते? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Kalyan Crime : खडवली नदीकाठी तरूणाचा मृतदेह आढळला; पोलिसांना वेगळाच संशय

Vastu Shastra: या ५ गोष्टी चुकूनही कोणाला भेट देऊ नका; नातं तुटण्याची असते दाट शक्यता

Divyanka Sirohi Death: रील बनवताना खाली कोसळली; लोकप्रिय अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

SCROLL FOR NEXT