Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वाह बेटे! पठ्ठ्या अभ्यास सोडून तरुणीच्या डोक्यातील काढतोय उवा; VIDEO पाहताच नेटकरी हसून बेहाल

Funny Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो एका तरुणीच्या डोक्यातील उवा काढत आहे.

Tanvi Pol

Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा जगाच्या कोपऱ्यात घडलेला अपघात व्हायरल होतो तर कोणत्या ठिकाणी झालेली गमतीदार घटना. सध्या सोशल मीडियावर असाच एक गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुण क्लासरुममध्ये असताना एका तरुणीच्या डोक्यातील उवा काढत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक क्लास रूम दिसत आहेत. या क्लासरुममध्ये एक तरुणी क्लासरुमच्या पाठच्या बेंचवर बसलेली आहे मात्र काही वेळात तुम्ही व्हिडिओत पाहिले तर एक तरुण क्लासरुममधील बेंचवर बसून एका तरुणीच्या डोक्यात पाहत आहे पंरतू तुम्ही व्हिडिओ(Video) नीट पाहिला तर समजेल की तो तरुणीच्या डोक्यातील उवा काढत आहे. संपूर्ण व्हिडिओ तिथे असलेल्या एका तरुणाने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

तरुणाचा गमतीदार व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो ''bihari.broo'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करुन काही दिवस झाले मात्र काही दिवसांत व्हिडिओला ८८ हजारपेक्षा अधिक नेटकऱ्यांचे लाईक्स आणि लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत.

व्हिडिओ मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला असून अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''पाहाव ते नवल'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''आज पर्यंतचा गमतीदार व्हिडिओ'' तर अनेक नेटकऱ्यांनी हसण्याचे इमोजी दिलेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT