Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या काही महिलांचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी एका मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स केलेला आहे.

Tanvi Pol

Women Dance Video: सोशल मीडियावर कायम अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी चिमुकल्यांचे शाळेतील डान्स तर कोणाचा लग्नाच्या वरातीमधील डान्स. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत काही महिला चाळीत दिसत आहे. प्रत्येकीने विविध रंगाची साडी नेसलेली आहे. साधारण ७ ते ८ महिला आहे. ज्या चाळीतील एका कार्यक्रमानिमित्ताने डान्स (Dance)करण्यासाठी जमा झालेल्या आहेत. काही वेळात या महिला मराठीतील,''दिलात झापुक झूपूक'' या गाण्यावर डान्स करताना दिसत असून चाळीत बसलेले अनेक व्यक्ती काकूंचा डान्स झाल्यानंतर टाळ्या वाजवताना दिसत आहेत. काकूंचा सर्व डान्सचा व्हिडिओ चाळीतील एका सदस्याने आपल्या मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

काकूंच्या डान्सचा व्हिडिओ ''इन्स्टाग्राम'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''mansi.gawande.73'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. दोन दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला असून तब्बल ८० हजारहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओ लाईक्स केलेले आहे तर लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला आहे. शिवाय अनेक नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''महिलांनी तर राडा केला'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''जबरदस्त डान्स'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''डान्स आवडला त्यांनी लाईक करा''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्टर्न फ्रीवेचा विस्तार होणार, आता दक्षिण मुंबई ते ठाण्यात ३० मिनिटांत पोहोचा; कधी होणार काम पूर्ण?

Health Tips: आजोबा म्हणणार, अभी तो मैं जवान हूँ; साठीनंतरही तुम्ही दिसणार 'तरुण'

Local Body Election: मतदानाच्या आदल्या दिवशी हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; बॅगेत 100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल

Maharashtra Politics : 'भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत'; कोकणात राणे बंधूंमध्ये संघर्ष पेटला

पनवेलमध्ये मतदार यादीतील मोठा घोळ उघड; 268 मतदारांचा एकच बाप

SCROLL FOR NEXT