Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: प्रसंगावधान! धावत्या मालगाडीखाली अडकली महिला, देवासारखे लोक धावले अन्..., थरारक VIDEO

Shocking News: सोशल मीडियावर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेले आहे. तुम्हीही एकदा व्हायरल व्हिडिओ पहा.

Tanvi Pol

Women Viral Video: सोशल मीडियावर कायम विविध ठिकाणी घडलेल्या अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. बऱ्याचदा घडलेल्या घटनांचे मुख्य कारण अति घाई किंवा अति वेग असतो,मात्र असे असूनही वारंवार अति घाईमुळे अपघात किंवा काही व्यक्ती संकटात सापडतात. सध्या या गोष्टी संबंधित महिलाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात महिला वेळ वाचवण्यासाठी ट्रेन खालून गेली मात्र धावत्या ट्रेनच्या खाली अडकली जाते.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका रेल्वे ट्रॅकवरुन ट्रेन जाताना दिसत आहे. ट्रेन जात असताना अनेक नागरिक ट्रेनच्या खाली वाकून काहीतरी पाहताना दिसत आहे जर तुम्हीही ट्रेनच्या खाली नीट पाहिले तर एक महिला अडकलेली दिसत आहे. काही वेळाने नागरिकांनी सांगितल्यानंतर ट्रेनचा वेग कमी होऊन ट्रेन थांबते आणि तिथे जमलेले नागरिक महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात यशस्वी होतात. तेथिलच एका व्यक्तीने सर्व घटना मोबाईलमध्ये कैद केली आहे.

सर्व थरारक व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''घाईघाईत एक महिला रेल्वे रुळावर पडली. तेवढ्यात लष्कराची विशेष मालगाडी आली. महिला ट्रॅकच्या मध्यभागी पडली. संपूर्ण ट्रेन तिच्या अंगावरून गेली. महिला पूर्णपणे सुरक्षित आहे, मथुरा यूपी'' असे घडलेल्या घटनेचे कारण लिहिले आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''येवढी काय घाई असते'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''काय गरज होती'', अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT