Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: यांनी कहरच केला! नवरा-नवरीला उंच उचलण्याची स्पर्धा, पुढे जे घडले ते पाहून डोक्यावर हात माराल

Shocking Wedding Stunt: सोशल मीडियावर सध्या एका लग्नातील व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत असे काही होते,ते पाहिल्यानंतर प्रत्येकजण संताप व्यक्त करत आहे.

Tanvi Pol

Viral wedding moment: लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो.वर आणि वधू शिवाय त्यांच्या कुटुंबीयासाठी हा अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो.परंतु,बऱ्याचदा वऱ्हाडी मंडळीच्या अतिउत्साहामुळे आनंदाचा क्षण एका क्षणात बदलून जातो.सध्या असाच काहीसा प्रकार एका लग्नात घडलेला आहे.ज्यात एका लग्नात अति उत्साही वऱ्हाडी मंडळीमुळे असं काही घडलं ते पाहून प्रत्येकजण संताप व्यक्त करत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लग्नाच्या स्टेजवर नवरा आणि नवरी दिसत असून अनेक त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती दिसत आहे.लग्नाच्या विधी सुरु असताना अति उत्हासात नवरीला उचलण्याचा प्रयत्न करतात मग काय नवरदेवाच्या कुटुंबातीलही नवरदेवाला उचलून घेतात मात्र हा प्रकार स्टंटबाजीमध्ये बदलतो आणि कोण उंच उचलून घेतो ही स्पर्धा लागते.मात्र,तुम्ही पाहिले तर मस्ती मस्तीमध्ये आणि समतोल न साधल्यामुळे दोघेही स्टेजवर जोरात कोसळतात.सर्व धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.

हा व्हिडिओ नेटकऱ्यांना सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताना दिसून येत असून इन्स्टाच्या 'prahaarnewsline' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''जीवघेणी मस्करी! लग्नात नवरा नवरीला उचलले आणि...''असे घडलेल्या घटनेचे थोडक्यात वर्णन केले आहे.व्हिडिओला आतापर्यंत लोकांनी अनेक लाईक्स केलेले असून लाखोंच्या घरात व्ह्यूजही व्हिडिओला मिळत आहेत.

लग्नातील हा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर पोस्ट होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''बिनडोक काही ही करतात''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''सध्या अस प्रत्येक लग्नात करताना दिसून येतात''तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''देवा काय हा प्रकार''तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत गॅस तुटवड्यामुळे आंदोलन

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ४००० तर चांदी १०००० रुपयांनी स्वस्त

Nagpur Crime: पोलिसांचा अजब न्याय! तक्रार देणाऱ्याच्याच कानफटीत मारली; कानाचा पडदाच फाटला

गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक; कपडा व्यापाऱ्याला १४ लाखांचा गंडा

Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधव आठ वर्षांनंतर करणार रंगमंचावर एन्ट्री; 'ॲनिमल' नाटकात साकारणार दुहेरी भूमिका

SCROLL FOR NEXT