Snake Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Snake Video: बापरे..! रेल्वे स्टेशनमध्ये घुसला ६ फूट लांब साप, प्रवाशांची धावाधाव; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर आपण अनेक सापांचे व्हिडिओ पाहिले. कधी घरात तर कधी बेडरुमधील पलंगावर मात्र सध्या एका रेल्वे स्टेशनमध्ये भलामोठा साप दिसून आलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्राण्यासंबंधित व्हिडिओ व्हायरल झालेले पाहिले आहे. मात्र पावसाळा सुरु झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी साप आणि मगर आढळून आल्याचे व्हिडिओ वारंवार व्हायरल होत आहेत. परंतू असाच एक व्हिडिओ ऋषिकेश रेल्वे स्टेशनमधला व्हायरल झालेला आहे, जिथे प्रवाशांच्या गर्दीत असलेल्या प्लॅटफॉर्मवर भलामोठा साप आढळून आलेला आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला ऋषिकेश रेल्वे स्थानकातील एक प्लॅटफॉर्म दिसून येत आहे. या व्हिडिओत एक प्लॅटफॉर्मवरील पाणी भरण्याची जागा दिसत आहे जर तुम्ही पाण्याच्या टाकीजवळ पाहिले तर एक भला मोठा साप सरपटताना दिसून येत आहे. याच प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दीही आहे.

भला मोठा ६ फूटाचा साप (Snake)मोठ्या वेगात दुसऱ्या ठिकाणी जाताना दिसून येतोय. मात्र सापाला पाहून प्रत्येक प्रवाशाची धावाधाव होत आहे. यानंतर साप जाऊन एका कडप्याखाली जाऊन लपून जातो असे व्हायरल व्हिडिओत (Video) दिसून येत आहे. संपूर्ण सापाचा थरार (thrill) प्लॅटफॉर्मवरील एका प्रवाशाने मोबाईमध्ये कैद केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ऋषिकेश रेल्वे स्थानकातील आहे. संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला असून तो व्हिडिओ ''@chorasyahariom'' या पेजवर तुम्हाला पाहता येईल.

व्हिडिओ व्हायरल होताच व्हिडिओ पाहून प्रत्येक यूजर्संनी अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने कमेंट्स बॉक्समध्ये लिहिले आहे की,''काय होईल आता सांगता येणार नाही'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''खूपच भयानक आहे'' तर एका यूजरने लिहिले आहे की,''साप विनाकारण काही कोणाला करणार नाही''. व्हिडिओला आतापर्यंत ३ हजारहून अधिक व्ह्यूज आलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे–पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

SCROLL FOR NEXT