Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नाद पाहिजे फक्त! तुझ्यासाठी आले वनात गाण्यावर काकांचा खतरनाक डान्स; VIDEO जोरदार व्हायरल

Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका काकांचा डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला डान्स नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस येत असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया केल्यात.

Tanvi Pol

Uncle Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका काकांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर काकांच्या डान्सचे कौतुक होतच आहे मात्र नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतील व्हिडिओ येत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही ठरवा काकांचा डान्स कसा आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक काका एका दुकानाबाहेर उभे असतात, त्यानंतर तिथे असलेल्या दुकानात ''तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे'' हे गाणं वाजण्यास सुरुवात होते. मग काय दुकानाबाहेर उभे असलेले काका थेट त्या लागलेल्या गाण्यावर ठेका धरतात. काकांचा डान्स(Dance) पाहून रस्त्यावरुन जाणारे अनेकजण थांबतात आणि डान्स पाहण्याचा आनंद घेतात तर काहीजण मोबाईलमध्ये डान्स शूट करत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ''lavanipremi'' आणि ''nistakahar'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट एका दिवसापूर्वी झाला असून आतापर्यंत या व्हिडिओला अनेक लाईक्स मिळाले आहे तर असंख्य असे व्ह्यूज मिळत आहेत. एवढेच नाही तर या अकाउंटवर अनेक डान्सचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेले आहे.

काकांचा डान्स नेटकरी वर्गाच्या मोठ्या पसंतीस आलेला असून बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''मनसोक्त जीवनाचा मनमुराद आनंद लुटतात काका खूप छान'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''नाद असला की सगळ्या गोष्टी होतात'', अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

SCROLL FOR NEXT