Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दिल्लीतील बसमध्ये महिलांची दे दणादण; सीटच्या कारणावरुन एकमेंकीना बेदम बुक्क्या; पाहा VIDEO

Delhi Bus Viral Video: दिल्ली मेट्रोनंतर आता दिल्ली बसमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे, ज्या व्हिडिओत महिलांची तूफान हाणामारी होताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता सोशल मीडियावर दिल्ली बसमधीलही हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होण्यास सुरवात झालेली आहे. दिल्ली मेट्रोनंतर दिल्ली बसमध्ये प्रवाशांच्या हाणामारीचे तसेच कपलचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिल्ली बसमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओत दोन महिलांची तूफान हाणामारी होताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओत दिल्ली (Delhi) बस दिसून येत आहे. या बसमध्ये अनेक प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. याच गर्दीत दोन महिलांची बसमधील सीटवर बसण्याच्या कारणावरुन जोरदार वादविवाद होत आहे. त्याच्या सोबत एक तरुणही त्यांच्या भाडंणाचा हिस्सा असलेला दिसून येत आहे. काही वेळात व्हिडिओ (Video) पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली महिला ही तिच्या समोर उभी असलेल्या महिले सोबत आणि तिच्या बाजूला बसलेल्या तरुणासोबत भांडत (Fighting) आहे.

मात्र ते दोघेही त्या महिलेसोबत भांडत आहे. काही वेळात समोर असलेली महिला खाली बसलेल्या महिलेला मारण्यास सुरुवात करते शिवाय तो तरुणीही त्या महिलेचे बोट जोरात मोडण्याचा पर्यंत करतो, त्यामुळे महिलेला त्रास होताना दिसून येत आहे. सर्व धक्कादायक प्रकार बसमधील सह प्रवाशांनी मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

दिल्लीम बसमधील व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ १७ सप्टेंबर रोजीचा असल्याचे समजते. मात्र व्हिडिओला कमी कालावधीतच लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पोस्ट होताच प्रत्येक यूजरने अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' त्या तरुणावर कारवाई झाली पाहिजे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' कोण चूकीचे कोण बरोबर काय माहिती'' तर अजून एका यूजने कमेट्स बॉक्समध्ये लिहिले आहे की,'' फक्त व्हिडिओ पाहा'' अशा अनेक बाजूंनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Delhi : CNG पंपावर मोठा स्फोट, तिघांचा मृत्यू; गॅस भरताना टाकी फुटल्यानं परिसरात खळबळ

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

SCROLL FOR NEXT