Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आवाजावरून दोन गट एकमेकांना भिडले, हातात काठ्या आणि तलवारी घेऊन जोरदार राडा; पाहा VIDEO

Fighting Viral Video: वादविवाद होणे अत्यंत सोपी गोष्ट आहे. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत होत असलेली हाणामारी पाहून प्रत्येकजण हैराण झालेले आहे.

Tanvi Pol

Greater Noida Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला कायम हाणामारीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. कधी कॉलेजच्या तरुणांची हाणामारी होत असते तर कधी प्रवाशांची ट्रेनमध्ये, मात्र सध्या उत्तर प्रदेशामधील ग्रेटर नोएडामधील एका हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात दोन गट हातात तलवार आणि काठ्या घेऊन एकमेकांना मारण्यासाठी सोसायटीमध्ये जमले आहेत. नक्की काय घडले असेल ते तुम्ही पाहा.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, सोसायटीच्या खाली अनेक नागरिक मोठ्या संख्येने जमलेले आहेत. मात्र तुम्ही व्हिडिओत पुढे पाहिले तर सोसायटीच्या खाली जमलेले नागरिक एकमेंकासोबत जोरदार हाणामारी करताना दिसत आहे. एवढेच नाही तर हाताता काठी आणि तलवार येऊन एकमेंकाना मारण्यासाठी दोन गट सोसायटीमध्ये उतरले आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ (Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ग्रेटर नोएडामध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. मात्र तो व्हिडिओ एक्सवरील ''@tricitytoday'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला असून कॅप्शनमध्ये,''ग्रेटर नोएडा सोसायटीत दोन गटांमध्ये हाणामारी'' असे लिहिण्यात आलेले आहे.

व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला असून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''सध्या प्रत्येक ठिकाणी अशा हाणामारी पाहण्यासाठी मिळत आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''भयानक आहे'', अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Snake Bite: सापाने दंश केल्यानंतर काय करावं?

राहुल गांधींकडून कार्यकर्त्यांचा विश्वासघात; काँग्रेसच्या महिला नेत्याचे गंभीर आरोप

Breastfeeding Mothers : बालकांना स्तनपान करणाऱ्या मातांसाठी या ५ गोष्टी नक्की कराव्यात, तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर फेरीवाल्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT