Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: प्रवाशांची बाचाबाची आता थांबणार, प्रवाशाने ट्रेनमध्ये बसण्यासाठी शोधला अजबच जुगाड; पाहा व्हायरल VIDEO

Mumbai Local Train: सोशल मीडियावर सध्या लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका प्रवाशाने अनोखा जुगाड केलेला आहे.

Tanvi Pol

Viral Video News: सोशल मीडियावर कायम मुंबई शहरातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल होत असलेल्य व्हिडिओत जास्तीत जास्त व्हिडिओ हे मुंबई लोकल ट्रेनमधील असतात. मग या लोकल ट्रेनच्या व्हिडिओत महिलांच्या हाणामारीचे तर कधी पुरुषांच्या ट्रेनमधील भजनाचे. मात्र सध्या लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, मात्र त्या व्हिडिओत एका काकांनी ट्रेनमध्ये जागा न मिळाल्याने भन्नाट जुगाड शोधून काढल्याचा आहे. नक्की काय घडले आहे ते तुम्ही पाहा.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, प्रवाशांनी खचाखच भरलेली ट्रेन दिसून येत आहे. प्रवाशांसाठी बसण्यासाठी असलेल्या सर्व सीटवर प्रवाशी बसलेले आहे. मात्र याच लोकल ट्रेनच्या गर्दी एक पुरुष प्रवाशी आपली बॅग ऑपन करतो आणि त्यामधून बसण्यासाठी एक प्लास्टिकचा स्टुल काढतो आणि प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेन तो स्टूल ठेवतो आणि बसण्यासाठी जागा करतो. या भन्नाट कल्पनेमुळे सध्या सर्वत्र या व्हिडिओची(Video) चर्चा होत आहे.

काकांचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@borivali_churchgate_bhajan'' या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले असून व्हिडिओला असंख्य लाईक्स आणि बऱ्याच प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''मराठी माणूस लहान पणा पासूनच हुशार आहे पण गर्व नाही केला कधी'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''मस्तच'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे,'' कुठून एवढ्या कल्पना सुचतात'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT