Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कधी पाहिलाय का असा जुगाड? वेटिंगवर तिकीट, स्वत:चं केली सोय; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Funny Viral Video: सोशल मीडियावर सध्या ट्रेनमध्ये जागा न मिळाल्याने एका प्रवाशाने अजबच जुगाड केलेला आहे. त्याचा सर्व व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Train Viral Video: गेल्या काही दिवसांपासून दिवाळीचा सणांचा सर्वांना सुट्ट्या होत्या. मग काय अनेकजण फिरण्यासाठी गेले होते तर अनेकजण गावी गेले होते. मात्र आता सुट्ट्या परत संपत असल्याने प्रत्येकजण घरी परतात आहे. कोण बसने तर कोण रेल्वेने परंतू जास्तीत जास्त नागरिक ट्रेनने प्रवास करत आहे,त्यामुळे रेल्वेमध्ये अनेकांना वेटिंग तिकिटावर प्रवास करावा लागत आहे,त्यातून अनेकजण मिळेल तशी ट्रेनमध्ये सीट मिळेल तिथे बसत आहे. मात्र सोशल मीडियावर एक ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी एका प्रवाशाने अजबचा जुगाड शोधून काढलेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला प्रवाशांनी भरलेली ट्रेन (Train) दिसून ते आहे, मात्र त्यातही ट्रेनधील कंपार्टमेंट दिसत आहे. ज्या कंपार्टमेंटमध्ये अनेक व्यक्ती सीटवर झोपलेले आहेत तर काही सीटवर बसलेले आहेत. मात्र त्यात तुम्ही पाहिले तर ट्रेनमधील अपर बर्थ सीट असते त्यामधील जागा आहे, ज्यात एका प्रवाशांनी मोठ्या दोऱ्याने झोपण्यासाठी जाळी पद्धतीसारखी जागा केली आहे. सर्व जुगाड एका प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

ट्रेनमधील सर्व जुगाड ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@MANJULtoons'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''मंत्री महोदयांनी 7000 गाड्या धावल्या असून प्रवाशांना आश्वासन देऊन बर्थची संख्या वाढवली आहे. आता कुठेही अडचण नाही'' असे गमतीदार लिहिण्यात आलेले आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या पसंती आलेला असून अनेक नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''हे कमी आहे.चादर अजून मध्यभागी ठेवायची आहे,''गजब जुगाड शोधून काढलेला आहे'',अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT