Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शिक्षक रॉक, विद्यार्थी शॉक...भरवर्गात विद्यार्थ्यांची केली चंपी; व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

Funny Viral Video: सोशल मीडियावर एका शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात नक्की काय घडलं असेल ते पाहा.

Tanvi Pol

Viral Video: शाळेतील दिवस आपल्या प्रत्येकासाठी खूप खास असतात. शाळेत केलेली मस्ती ते शाळेतील शिक्षकांनी लावलेली शिस्त कायम लक्षात राहिलेली आहे. आपल्या प्रत्येकाडे शाळेतील असंख्य आठवणींचा खजिना साठवलेला असेलत. त्यातील एक शाळेतील आठवण एक व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून पुन्हा लक्षात आली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नक्की काय घडलं असेल ते तुम्ही एकदा पाहाच.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत एका शाळेतील किंवा कॉलेजमधील वर्ग दिसून येत आहे. या व्हिडिओत पाहिले तर काही विद्यार्थींनी बँचवर बसलेल्या आहेत तेवढ्यात तिथे एक सर हातात तेलाची बॉटल घेऊन येतात आणि एका विद्यार्थीनीच्या हातात तेल घेण्यास सांगतात. मात्र ती विद्यार्थींनी तेल हातात घेऊन केसांना लावण्यासाठी अजिबात तयार नसते कारण तेलामुळे सर्व केस तेलकट होतील. मात्र तिथे असलेले सर तीच काहीही ऐकत नाही. तिच्या हातात तेल ओततात आणि केसांना लावण्यास सांगतात. त्यानंतर त्याच वर्गातील एका विद्यार्थ्यांच्या केसांत तेल लावतात आणि हेअर स्टाईल केलेल्या केसांना तेलाच्या साहाय्याने नीट करतात. सर्व व्हिडिओ (Video) तेथिल एकाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''jamakhandi_i_a'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यासोबत कॅप्शनमध्ये,''सर्व चांगल्या गोष्टी, खोबरेल तेल खराब झालेले केस मॉइश्चरायझ आणि दुरुस्त करण्यात मदत करू शकते'' असे गमतीदार कॅप्शन लिहिले आहे. व्हिडिओ चार दिवसापूर्वी शेअर केल्यानंतर तब्बल लाखोंच्या संख्येने पाहिला गेला आहे आणि अनेक लाईक्सही व्हिडिओला मिळाले आहेत.

तरुणींचा व्हिडिओ इन्स्टाग्राम मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी पाहिला आहे. त्यानंतर बऱ्याच प्रतिक्रियाही व्हिडिओवर आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''अरे वाह, असे शिक्षक असले पाहिजेत'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,'' सर आमच्या कॉलेजमध्ये पण या खुप हिरोईनी झालेल्या आहेत'' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,''एक नंबर सर सॅल्यूट तुम्हाला'', अशा प्रकारे काहींनी शिक्षकाचे कौतुक केलेले आहे तर काहींनी गंमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुजरातमधील उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तुफान गर्दी, 24 तासांपासून नागरिक रांगेत उभे

Vijay Thalapathy: सुपरस्टार विजयची राजकारणात धमाकेदार एण्ट्री; नागरिकांना घातली भावनिक साद, सभेची गर्दी पाहून व्हाल अवाक्

Maharashtra Politics: 90 90 90 नाही, आमची यादी जिंकण्यासाठी आहे, भाजप अध्यक्षांचा मविआला टोला

Bandra Terminus: वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाला जाग; प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीबाबत घेतला मोठा निर्णय

Camphor Oil Benefits: केसांसह अनेक समस्यांवर कापूरचे तेल ठरते रामबाण

SCROLL FOR NEXT