Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मित्रांचा काय नेम नसतो! फटक्याच्या डब्ब्यावर बसवलं, वात पेटवली, पुढे काय घडलं ते पाहून थरकाप उडेल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नक्की काय घडले तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Bengaluru Viral Video: सोशल मीडियावर सध्या बंगळुरुमधील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात काही मित्रांनी त्यांच्या एका मित्राला नवीन रिक्षा विकत घेऊन देतो असे सांगितले मात्र त्यासाठी त्याला फटाक्यावर बसण्याचे आव्हान दिले. परंतू संपूर्ण मित्रांच्या मस्तीमध्ये त्या फटाक्यावर बसलेल्या व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. सध्या या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओत तुम्हाला दिसते की, एका परिसरात काही मित्रांचा गट जमलेला दिसत आहे. ज्यात काही तरुण दुसऱ्या तरुणाला एका बॉक्सवर बसवताना दिसत आहेत मात्र तुम्ही तो बॉक्स पाहिला तर तो बॉक्स फटाक्यांनी भरलेला आहे. काही वेळात त्या गटातील एक तरुण त्या फटाक्याच्या बॉक्समधील फटाका जळवतो मात्र काही क्षणातच फटाक्यांनी भरलेला बॉक्स फुटतो आणि त्यावर बसलेला तरुण जमिनीवर कोसळतो. या सर्व घटनेत फटाक्यांच्या बॉक्सवर बसलेल्या तरूणाचा मृत्यू होतो. सर्व घटना (Incident) त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ''@JITENDERMONGA_'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''32 तरुणाला कोननकुंटे, बेंगळुरू येथे फटाक्यांनी भरलेल्या बॉक्सवर बसवण्यात आले. फटाक्याच्या पेटीवर बसण्याचे आव्हान त्याने जिंकल्यास त्याच्या मित्रांनी त्याला ऑटोरिक्षा खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते.ज्यात तरुणाचे निधन झाले आहे''.सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत असून व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

SCROLL FOR NEXT