Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: काय ती स्टाईल...काय तो स्वॅग! विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाचा दमदार डान्स

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका शिक्षकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ एका शिक्षकाने धम्माकेदार डान्स केला आहे. जो पाहिल्यानंतर सर्वत्र त्यांची चर्चा होत आहे.

Tanvi Pol

Teacher Dance Video: शिक्षक हा विद्यार्थाचा उत्तम मार्गदर्शक असतो, बऱ्याचदा तेच शिक्षक आपल्या हटके अंदाजाने विद्यार्थ्यांचे लाडके आयडॉलही बनतात. सध्या सोशल मीडियावर एका शिक्षकाचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसमोर त्यांनी दिलेल्या परफॉर्मन्समुळे सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉलेजचा कॅम्पस दिसत असून कॅम्पसमध्ये अनेक विद्यार्थी जमलेले आहेत, त्यातच एक शिक्षक कॅम्पसच्या मधोमध आहे. त्यातच शांत वाटणारे शिक्षक मध्येच डान्स करण्यास सुरुवात करतात. डान्स करताच शिक्षकांची स्टाईल आणि डान्स(Dance) स्टेप्स पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे शिवाय डान्सचे कौतुकही करत आहेत.

हा डान्स व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम, आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र तो 'gatalbum' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. हा डान्स व्हिडिओ नक्की कुठल्या कॉलेजमधील आहे हे आणि या शिक्षकाचे नाव काय हे समजले नाही.

नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया

शिक्षकाचा(Teacher) डान्स सर्वांना एवढा पसंतीस आला की, त्यावर अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''खतरनाक आहे शिक्षक'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''कमाल डान्स केला'' तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''जबरदस्त'',अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT