Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वाह भाई! इमारतीचं प्लास्टर वेगात करण्यासाठी अजबच जुगाड, कामगांरानं चक्क जेसीबीच वापरला; पाहा VIDEO

Viral News: सोशल मीडियावर सध्या एक अजबच जुगाड केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय केले असेल ते पाहा.

Tanvi Pol

Deshi Jugad Viral Video: आपल्यापैंकी प्रत्येकजण काम सोपे होण्यासाठी अनेक जुगाड करतात. बऱ्याचदा या जुगाडामुळे काम सोपे होते तर अनेकदा जुगाड फसतो आणि काम अपूर्ण राहते तर कधी पूर्णपणे बिघडते. सध्या सोशल मीडियावर काही कामगारांचा हटके जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी नक्की काय केले तुम्ही पाहा.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका इमारतीचे काम सुरु असलेले दिसत आहे. ज्यात इमारतीला प्लास्टरचे काम करण्यात येत आहे. मात्र जर तुम्ही व्हिडिओत नीट पाहिले तर दिसेल की चक्क कामगार काम सोपे होण्यासाठी जेसीबीने ट्रॉली बांधून तीन मजली इमारतीचे प्लास्टर करत आहेत. व्हिडिओ(Video) पाहून तुम्हाला थोडी भिती वाटेल मात्र नक्कीच कामगारांची कल्पना पाहून डोक्याला हात लावाल. सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.

कामगांराचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या वाऱ्याच्या वेगात व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''duhewala_nirmal'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही केलेला आहे. मात्र नक्की कुठल्या शहरातील हा व्हिडिओ आहे हे समजू शकलेले नाही.

नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया

अनोखा जुगाड व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. पहिल्या युजरने लिहिले आहे की,''कुठून येताता अशी लोकं'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''मानलं राव या लोकांना'' तर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात साखर उद्योगासाठी ३ हजार कोटींचे प्रकल्प - अमित शहा

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर? ऑपरेशन टायगरनंतरच्या त्या एका ट्विटनं राजकारणात खळबळ

Gaganbawada Waterfalls : गगनबावड्याच्या हिरव्यागार दऱ्यांतील ५ निसर्गरम्य धबधबे, पाहा पावसाळ्यात खुलणारे नंदनवन!

PM Kisan 23rd installment : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! बँक खात्यात २००० रुपये जमा, स्टेप बाय स्टेप असं करा चेक

SCROLL FOR NEXT