Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वय मॅटर करत नाही.. मुंबई लोकलमध्ये आजोबांचा एक नंबर स्वॅग, VIDEO पाहून तुम्हीली सूरात सूर मिळवाल!

Local Train Viral Video: सोशल मीडियावर पुन्हा एकदा लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. मात्र नक्की काय घडले असेल ते तुम्ही एकदा पाहाच.

Tanvi Pol

Local Train Viral Video: लोकल ट्रेनचा प्रवास प्रत्येक मुंबईत आलेल्या व्यक्तीला करावा लागतो. काहींसाठी लोकल ट्रेनचा प्रवास जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग झालेला आहे. रोजच्या प्रवासात सर्व थकवा आणि टेंशन आपल्या सहप्रवाशाची बोलून निघून जाते. मग हळू-हळू या रोजच्या प्रवासात एक ग्रुप बनून जातो, मग काय अनेक गमतीजमती सुरु होतात. सध्या सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील काही जणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे काहीजण मिळून भन्नाट गाणी लोकलमध्येच गाण्यास सुरुवात केली आहे. सध्या या माहोलचा व्हिडिओ सोशल मीडयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ एक लोकल ट्रेन दिसत आहे. मात्र या लोकल ट्रेनमधील पुरुषांचा एक डब्बा दिसत आहे. नेहमीसारखी या डब्ब्यात पुरुष प्रवाशांची मोठी गर्दी आहे. मात्र या गर्दीत दिवसभरातील थकवा आणि टेंशन कमी करण्यासाठी काही प्रवाशी गाणी म्हणताना दिसत आहेत. व्हिडिओत पाहिले तर काही प्रवाशी जे उभे आहे ते गाणी म्हणत आहे. काही वाद्य वाजवण्यास नाही म्हणून ते चक्क खिडकीच्या साईटला असलेल्या पत्र्याला वाजवत गाणी म्हणत आहेत. सर्व प्रवाशी या गाण्याची आणि क्षणाचा आनंद घेताना दिसत आहे. ट्रेनमधील व्हिडिओ (Video)एका प्रवाशाने मोबाईमध्ये कैद करत सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे, त्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

ट्रेनमधील व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत आहे. पंरतू तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील '@official.awaisazam's' या अकाउंटवर २ दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच तब्बल ८३ हजार नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिलेली आहे तर अनेक व्ह्यूज व्हिडिओला मिळत आहेत. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे की,'' बेस्ट गाणं'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' मस्तच काका'' तर अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी कमेट्स बॉक्समध्ये दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Shocking : नाशिकमध्ये माय-लेकासह मामाचा नदीत बुडून मृत्यू; दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर शोककळा

Maharashtra News Live Updates: ड्रगची विक्री करणाऱ्या दोघांना अटक, नागपूर क्राइम ब्रांच युनिट दोनचा पथकाची कारवाई

Hill Station : उंच शिखर अन् चहूबाजूंनी जंगल, हिवाळ्यात 'या' हिल स्टेशनचं सौंदर्य पाहाच

WTC Points Table: न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होऊनही टीम इंडिया WTC च्या शर्यतीत अव्वल, पण मार्ग आणखी खडतर

सरकारनं वाढवली ITR फाईल करण्याची मुदत; या लोकांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT