व्हायरल न्यूज

Viral Video: अरे बाप रे बाप! लहानग्या विचंवाशी पंगा घेण सात फुट सापाला पडंल महागात; पाहा धक्कादायक VIDEO

Shocking Viral Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात साप आणि विंचू याचा व्हिडिओ आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वात जास्त विषारी प्राणी साप आहे. सापाचं विष फक्त माणसांसाठीच घातक नाही तर प्राण्यासांठीही तितकच घातक आहे. या सर्वांमुळे प्राणी असो वा माणसं विषारी अशा सापापासूनच लाबंच राहतात. सोशल मीडियावर याआधी साप आणि मुंगूस यामधील झुंज होतानाचे व्हिडिओ आपण पाहिले आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर विंचू आणि साप यांच्या होणारी हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होतोय मात्र यात सापाला विंचवाशी पंगा घेण महागात पडलेले आहे.

नेमकं काय घडल?

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला एक साप दिसून येत आहे आणि एक लहानशा विंचू. या व्हिडिओत दिसणाऱ्या सापाची लांबी साधारण सात फूट आहे. त्यापुढे विंचू अतिशय लहान दिसून येतोय. काही वेळात सात फूट लांबीचा साप ( snake) विंचवाला पकडण्यास जातो त्यात त्यांची झुंज सुरु होते, मात्र व्हिडिओच्या अंती लहानगा विंचू सापाला त्याच्या नाग्यांत पकडून घेतो. सर्व धक्कादायक(Shocking) थरार तेथिल व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला इन्स्टाग्रामच्या ''rijeshkv_80'' या अकाउंटवर जावे लागेल. सोशल मीडियावर याआधीही अनेक साप आणि विविध प्राण्यांच्या झुंजीचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. सध्या विंचू आणि सापाच्या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी पसंती दिलेली आहे शिवाय अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत, एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,''साप कधीही खतरनाकच असतो'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' बापरे'' तर काहींनी आश्चर्यकारक इमोजी कमेंट्सबॉक्समध्ये दिलेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT