Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धावत्या बाईकवर तरुणाचा धक्कादायक स्टंट; VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

Bike Stunt Viral Video: सोशल मीडियावर सध्या काही तरुणांचा बाईक स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओतील तरुणांचा संताप व्यक्त केला जात आहे.

Tanvi Pol

Young Boy Viral Video: गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर रिल्स बनवण्याचे वेड तरुणांना लागले आहे. मग रिल्स बनवताना अनेक स्टंट केले जातात आणि त्या नादात बऱ्याच वेळा अनेकांना जीव गमवावा लागतो. पंरतू तरीही स्टंट करणे तरुण थांबवत नाही. सध्या सोशल मीडियावर काही तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक मोठा महामार्ग दिसून येत आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या रस्त्यावरून दोन बाईक जाताना दिसत आहे. एका बाईकवर दोन तरुण आहेत तर दुसऱ्या बाईकही एक तरुण आहे, मात्र तुम्ही व्हिडिओत पाहिले तर एक तरुण एका धावत्या बाईकवर चक्क उभा राहिला आहे. कोणताही सपोर्ट न घेता तो धावत्या बाईकवर उभा राहून फटाके फोड आहे. सर्व व्हिडिओ (Video)रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@dk_up_rider'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. दोन दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर व्हिडिओला अनेक लाईक्स आणि बऱ्याच प्रतिक्रिया मिळाल्या आहे. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' पोलिसांनी कारवाई करावी'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काय कराव यांच'' तर बऱ्याच यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात प्रचार सभा

David Warner : बॉल टॅम्परिंगमुळं करिअर पणाला लागलं, आता जबरदस्त कमबॅक; वॉर्नर थेट कॅप्टन झाला!

Maharashtra Election: आचारसंहितेत निवडणूक आयोगाची 'भरारी', महाराष्ट्रात 280 कोटींचा मुद्देमाल पकडला; फक्त 78 कोटी कॅश!

VIDEO : माझ्या नणंदेला कडक नोट आवडते; नवनीत राणांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका

Maharashtra : कपड्यांपासून ते ज्वेलरीपर्यंत सर्वकाही एकाच ठिकाणी, पुण्यातील बेस्ट शॉपिंग मार्केट

SCROLL FOR NEXT